Supreme Court – सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्तीपदासाठी नियुक्ती करण्यासाठी न्यायवृंदाने (collegium) नुकतीच राज्यांच्या उच्च न्यायालयांमधील काही न्यायमूर्तींच्या नावांची शिफारस केली. ही शिफारस शक्यतो सर्वसहमती व्हावी अशी अपेक्षा असते. मात्र न्यायमूर्ती विपुल मनुभाई पांचोली यांच्याबाबत अपवाद घडला आहे. न्यायमूर्ती पांचोली यांची शिफारस सर्वसहमतीने झालेली नाही. त्यांच्या नावाला पाच सदस्यीय न्यायवृंदातील एक सदस्य न्यायमूर्ती बी व्ही नागरत्न (justice B.V. Nagarathna) यांचा विरोध होता ,अशी माहिती आता पुढे आली आहे.
न्या. पांचोली हे पाटणा उच्च न्यायालयाचे विद्यमान मुख्य न्यायमूर्ती आहेत. मात्र त्यांची पाटणामध्ये बदली होण्यापूर्वी ते गुजरात उच्च न्यायालयात होते. तसेच उच्च न्यायालयाच्या सेवाज्येष्ठतेच्या यादीत त्यांचा ५७ वा क्रमांक लागतो. त्यामुळे न्या. नागरत्न यांनी सेवाज्येष्ठता आणि प्रादेशिक प्रातिनिधित्व या मुद्यांवर न्या. पांचोली यांची शिफारस करण्यास विरोध दर्शविला होता, अशी चर्चा काही प्रसिद्धी माध्यमांमध्ये आता ऐकू येत आहे.
न्या. नागरत्न यांच्या आक्षेपानुसार सर्वोच्च न्यायालयात गुजरात उच्च न्यायालयाचे आधीच दोन न्यायाधीश आहेत. न्या. जे बी पारडीवाला आणि न्या. एन व्ही अंजारिया हे गुजरात उच्च न्यायालयातून आलेले आहेत. न्या. पांचोली यांची निवड झाल्यास गुजरात उच्च न्यायालयातून येणारे ते तिसरे न्यायाधीश ठरतील. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे न्या. पांचोली यांना सर्वोच्च न्यायालयात स्थान मिळाल्यास त्यांना २०३१ मध्ये सरन्यायाधीशपदाची संधी मिळू शकते. न्या. पांचोली यांची गुजरातमधून बिहारमध्ये करण्यात आलेली बदली, यावरही प्रश्न चिन्ह लागू शकते. त्यामुळे एक चुकीचा पायंडा पाडला जाऊ शकतो.
ज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा
हे देखील वाचा –
आसाराम बापूचा अंतरिम जामीन मुदतवाढीस हायकोर्टाचा नकार!
15 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळणारे बेस्ट लॅपटॉप ; वाचा फीचर्स आणि किंमत