South Korea Smartphone Ban: लहान मुलं स्मार्टफोनचा वापर मोठ्या प्रमाणात करत असल्याचे गेल्याकाही वर्षात दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर आता दक्षिण कोरियाने (South Korea Smartphone Ban) एक नवीन कायदा मंजूर केला आहे, ज्यामुळे मार्च 2026 पासून शाळांमध्ये स्मार्टफोन आणि इतर स्मार्ट डिव्हाइसेसच्या वापरांवर बंदी घालण्यात येईल.
जास्त फोन वापर आणि सोशल मीडियाच्या व्यसनापासून विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. संसदेत या विधेयकाला दोन्ही बाजूंच्या पक्षांनी पाठिंबा दिला.
फ्रान्स, फिनलंड, इटली, नेदरलँड्स आणि चीनसारख्या देशांनी आधीच शाळांमध्ये फोन बंदी लागू केली आहे. हा निर्णय मुलांच्या कल्याणासाठी आवश्यक आहे. आपल्या तरुणांमध्ये सोशल मीडियाचे व्यसन गंभीर पातळीवर पोहोचले आहे’,असे जपानच्या एका खासदाराने सांगितले.
व्यसनावर नियंत्रण आणि विद्यार्थ्यांचे हक्क
या कायद्यामुळे शिक्षकांना शाळांमध्ये उपकरणांच्या वापरावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार मिळणार आहे. मात्र, दिव्यांग विद्यार्थी, आपत्कालीन परिस्थिती किंवा शैक्षणिक उद्देशांसाठी काही सूट देण्यात येईल.
तसेच, तंत्रज्ञानाचा योग्य वापर कसा करावा यासाठी शाळांना धडे देण्यासही प्रोत्साहन दिले जाईल. मात्र, काही शिक्षक हा कायदा विद्यार्थ्यांच्या हक्कांचे उल्लंघन असल्याचे म्हणत विरोध करत आहेत.
ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा
हे देखील वाचा –
Indian Economy : 2038 पर्यंत भारत होणार जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, EY चा अहवाल
Maratha Reservation: ‘मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण नाही’; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच केले
Mohan Bhagwat: ‘प्रत्येक भारतीय कुटुंबात तीन मुले हवीत’, मोहन भागवत यांचे मोठे विधान