मुंबई- मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil)यांचा लढा आरक्षणाचा (Maratha reservation) नाही. हा लढा एक राजकीय अजेंडा आहे, असा आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी पुन्हा एकदा केला आहे.
मनोज जरांगे यांनी आज मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू केले. या पार्श्वभूमीवर लक्ष्मण हाके यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते. ओबीसी आरक्षण (OBC reservation) हे शासनकर्त्या व राज्यकर्त्या जमातीपासून संरक्षण करण्यासाठी आहे. परंतु, ज्यांच्यापासून संरक्षण हवे तेच सगळे लांडगे ओबीसींच्या कळपात घुसले तर या मेंढरांचे काय होईल? जरांगेंच्या आंदोलनाचा फायदा घेऊन सरकार उलथवून टाकण्याचा प्रयत्न करण्यात अजित पवार यांच्या पक्षाचा (Ajit Pawar) हात आहे असा आरोप त्यांनी केला.
मनोज जरांगे यांचा लढा हा आरक्षणाचा नाही. मीडियाद्वारे मराठा बांधवांच्या शिक्षण व नोकरीचा कळवळा दाखवला जात आहे, मात्र हे तसे नाही. मनोज जरांगे यांनी मुंबईकडे निघतानाच हा राजकीय अजेंडा असल्याची आपली स्क्रिप्ट फोडली. मी हे सरकार उलथवून लावणार आहे. आम्ही आजपर्यंत यात विरोधी पक्ष सामील असेल असे म्हणायचो. पण, आता मी ठामपणे सांगतो की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार उलथवून लावण्यासाठी जसे विरोधी पक्षांचे आमदार खासदार (Opposition MLAs,MP)त्यात सामील आहेत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आमदार, खासदारही त्यात सामील आहेत. त्यामुळे माझी मराठा बांधवांना, तरुणांना हात जोडून कळकळीची विनंती आहे की, जरांगेंची ही मागणी मान्य केली तर महाराष्ट्रातील ओबीसी बांधवांचे आरक्षण संपलेले असेल. ओबीसी आरक्षण हे शासनकर्त्या व राज्यकर्त्या जमातीपासून संरक्षण करण्यासाठी आहे. ज्यांच्यापासून संरक्षण पाहिजे तेच सगळे लांगडे ओबीसींच्या कळपात घुसले तर या मेंढरांचे काय होईल? याची कल्पना इथल्या आमदार, खासदार, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस नेत्यांना नाही.
ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा
हे देखील वाचा –
Mohan Bhagwat: ‘प्रत्येक भारतीय कुटुंबात तीन मुले हवीत’, मोहन भागवत यांचे मोठे विधान
मीच देवेंद्र फडणवीसांना फोनवर रेड्डींना पाठिंबा देण्यास सांगणार ! उद्धव ठाकरेंचा टोला