Japanese Tech and Indian Intelligence to Spark a Revolution: PM Modi
Japan-India Synergy to Spark Revolution- जपानी तंत्रज्ञान व भारतीय बुद्धीमत्ता (intelligence to Spark a Revolution:)यांच्या संगमाने या शतकातील मोठी क्रांती होईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Modi) यांनी व्यक्त केला. ते आज जपानची राजधानी टोकियो इथे झालेल्या १५ व्या भारत जपान शिखर परिषदेत बोलत होते.(15th India-Japan Annual Summit)
आपल्या भाषणात पंतप्रधान म्हणाले, की जपान हा तंत्रज्ञानाचा ऊर्जास्रोत आहे, तर भारत बुद्धीमत्तेचा स्रोत आहे. भारताने कृत्रिम बुद्धीमत्ता, सेमीकंडक्टर, बायोटेक्नोलॉजी व अंतराळासारख्या क्षेत्रात पुढाकार घेतला आहे. भारत आता अणू क्षेत्रही खाजगी उद्योजकांसाठी खुले करत आहे. जपान हा भारताच्या विकासाच्या प्रवासात जपानचा मोठा सहभाग राहिला आहे. जपानने मेट्रो निर्मितीपासून ते सेमीकंडक्टरपर्यंत सर्वच क्षेत्रात सहकार्य केले असून जपानी कंपन्यांनी भारतात ४० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे.
यावेळी जपानचे पंतप्रधान शिगेरु इशिबा (PM Shigeru)म्हणाले, जपानचे तंत्रज्ञान व भारतीयांची बुद्धीमत्ता परस्पर पूरक आहे. अनेक जपानी कंपन्या मेक इन इंडिया मोहिमेत आपले योगदान देत आहेत. दोन्ही देशात होणाऱ्या परस्पर सहकार्याच्या करारामधून जपानच्या भारतातील गुंतवणूकीसाठी इच्छुक असल्याचे दिसून येत आहे. दोन्ही देशांमध्ये पुरवठा साखळी तयार करण्याचे प्रयत्न आता मूर्त स्वरुप घेत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दोन दिवसांच्या जपान दौऱ्यावर आलेले असून त्यांचे भारतीय समुदायाने स्वागत केले. त्यानंतर त्यांनी शिखर परिषदेला संबोधित केले. पंतप्रधान आपल्या दौऱ्यात विविध बैठकांना हजेरी लावणार आहेत. ३० ऑगस्ट रोजी ते जपानहून दोन दिवसांसाठी चीनला रवाना होणार असून तिथे ते शांघाय सहकार्य संस्थेच्या शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत.
ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा
हे देखील वाचा –
पंजाबमध्ये महापुराचा कहर! मदतीसाठी लष्करही पोहोचले
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण २८ व्या आरोपीला अटक
कोण आहेत उर्जित पटेल? RBI चे माजी गव्हर्नर आता IMF च्या कार्यकारी संचालकपदी