Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मनोज जरांगे पाटलांनी मनसेप्रमुख राज ठाकरे (MNS chief Raj Thackeray)यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली. राज यांनी जरांगेंच्या आंदोलनाबद्दल सर्व स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच देऊ शकतात, असे वक्तव्य केले होते. या पार्श्वभूमीवर जरांगे यांनी एकेरी शब्दांत राज ठाकरेंवर घणाघाती हल्ला चढवला. राज ठाकरे कुचक्या कानाचे आहेत, असे म्हटले.
जरांगे म्हणाले, की राज्यातल्या समाजाचे म्हणणे आहे की, ते दोघे भाऊ (Raj and Uddhav Thackeray) चांगले आहेत, ब्रँड चांगला आहे. पण हा विनाकारण मराठ्यांच्या प्रश्नात पडतो. आम्ही कधी तुम्हाला विचारले का की, ११ ते १३ आमदार निवडून दिले आणि ते पळून गेले, त्यानंतर तुम्ही आमच्या मराठवाड्यात कधी आलात? पुण्यात किंवा नाशिकमध्ये तुम्ही किती वेळा जाता? फडणवीसांनी एकदा लोकसभेला तुमचा गेम केला, विधानसभेला तुमच्या मुलाला पाडले, तरी तुम्ही त्यांचीच री ओढता. राज ठाकरे म्हणजे मानाला भुकेला पोरगा आहे. त्यांच्या घरी फडणवीस चहा पिऊन गेले, सगळा पक्ष बरबाद झाला तरी त्यांना चालते. आमच्या खेड्यात याला कुचक्या कानाचे म्हणतात.
यावेळी जरांगेंनी मंत्री नितेश राणे (Minister Nitesh Rane) यांच्यावरही टीका करताना त्यांचा उल्लेख चिंचुद्री असा केला. ते म्हणाले, चिंचुद्रीचे कधी पाय मोजता येत नाहीत. तिचा पायाचा मेळ लागत नाही. ती सर्व ऋतूत लाल असते आणि ती काय म्हणते हे कोणालाच समजत नाही. आंदोलन एकदा संपू द्या, मग नितेश राणेंना मी उत्तर देतोच.
ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा
हे देखील वाचा –
जीएसटी वाढीचा केरळच्या लॉटरी उद्योगाला फटका
पुणे ते नाशिक प्रवास फक्त 20 मिनिटांत! वाहतूक कोंडी संपवण्यासाठी नवा प्लॅन