Maharashtra Rain Updates: गणरायाच्या आगमनापासून सुरू झालेला पाऊस आता बाप्पाच्या निरोपावेळीही जोरदार हजेरी लावत आहे. हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवस राज्यात पावसाचा जोर वाढणार असून, 8 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आणि म्यानमार किनारपट्टीजवळील चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे राज्यात पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया. https://t.co/jw7yrf9chD भेट घ्या. pic.twitter.com/0jfY5RaDDx
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) September 1, 2025
कोणत्या जिल्ह्यात काय स्थिती?
मंगळवार (2 सप्टेंबर): विदर्भातील गडचिरोली आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून, कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूर तसेच मराठवाड्यातील हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.
बुधवार (3 सप्टेंबर): पुणे, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, चंद्रपूर आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने ‘ऑरेंज अलर्ट’ (Orange Alert) जारी केला आहे. याशिवाय, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, जालना, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गडचिरोली येथेही मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
गुरुवार (4 सप्टेंबर): कोकण किनारपट्टी आणि पश्चिम घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. नाशिक, पालघर, ठाणे, पुणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. तर सिंधुदुर्ग, नंदुरबार, धुळे, जळगाव, अमरावती जिल्ह्यांतही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यातील उर्वरित भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबई आणि परतीचा पाऊस:
मुंबई शहर आणि उपनगरांमध्येही पावसाची रिमझिम सुरू राहील. दरम्यान, सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता असून, याच दरम्यान परतीच्या पावसालाही सुरुवात होईल. त्यामुळे काही भागांमध्ये टप्प्याटप्प्याने तापमान वाढेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा
हे देखील वाचा –
पंतप्रधान मोदी ‘या’ तारखेला मणिपूरला भेट देण्याची शक्यता’; हिंसाचारानंतर पहिला संभाव्य दौरा
कॅन्सरमुळे प्रिया मराठेचे निधन; जाणून घ्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे आणि उपाय