Acquitted Rape Accused Sent Back to Jail by Supreme Court
SC Reverses Acquittal in Rape Case – सर्वोच्च न्यायालयाने (SC)एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपातून(Rape Accused) निर्दोष सुटलेल्या दोन आरोपींना पुन्हा गजाआड (Sent Back to Jail)करण्याचे आदेश दिले. तसेच भारतीय न्याय व्यवस्थेतील त्रुटींचा गैरफायदा घेत बलात्कारासारख्या लांच्छनास्पद गुन्हा करणारे आरोपी निर्दोष सुटणे हे अत्यंत दुर्दैवी आहे, अशी खंत व्यक्त केली. २०१६ मध्ये बिहारमधील प्रकरणात एका १२ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांनी लैंगिक अत्याचार केला होता. या खटल्यात कनिष्ठ न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवून शिक्षा ठोठावली होती. मात्र पाटणा उच्च न्यायालयाने(Patna High Court) हा निर्णय रद्द करून आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला पीडितेच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले.
न्या. संजय कुमार आणि न्या. सतीशचंद्र शर्मा यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर नुकतीच सुनावणी झाली. त्याप्रसंगी न्यायालयाने बलात्कारासारख्या गुन्ह्यात केवळ तांत्रिक त्रुटींच्या आधारे गुन्हेगारांना निर्दोष मुक्त केले जात असल्याबद्दल तीव्र नाराजी आणि चिंता व्यक्त केली. उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करून कनिष्ठ न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवण्याचा दिलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रास्त ठरवला. तसेच आरोपींना शिक्षा भोगण्यासाठी कारागृहात शरण येण्याचे आदेश दिले.
याप्रसंगी न्यायालयाने देशाच्या न्याय व्यवस्थेच्या सद्यस्थितीवर टोकदार भाष्य केले. बलात्कारासारख्या घटनेला सामोरे जावे लागणाऱ्या मुली-महिलांचा आपल्या देशात दोन प्रकारे छळ होतो. एक तर बलात्कारामुळे त्यांचे मानसिक खच्चीकरण होते. दुसरीकडे वर्षानुवर्षे चालणाऱ्या न्यायालयीन प्रक्रियेअंती आरोपी मोकाट सुटल्यास त्यांच्या मनाला अतोनात वेदना होतात. अशा प्रकारे केवळ प्रक्रियेतील कमकुवत दुव्यांचा आधारे बलात्काराच्या आरोपींना निर्दोष मुक्त करणे हे संपूर्ण न्यायव्यवस्थेचे अपयश म्हणावे लागेल, अशा शब्दांत न्यायालयाने आपले परखड मत मांडले.
ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा
हे देखील वाचा –
मुंबईच्या गणेशोत्सवावर १७ वर्षांत पालिकेचे २४७ कोटी रुपये खर्च
भारताने बनवली संपूर्णत: स्वदेशी मायक्रोप्रोसेसर चीप
ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! विश्वचषकापूर्वीच दिग्गज गोलंदाजाने T20I क्रिकेटमधून घेतली निवृत्ती