Floods Grip 9 Districts in Punjab; Vaishno Devi Temple Closed for 7 Days
Floods Hit 9 Punjab Districts – पंजाबमधील पठाणकोट, होशियारपूरसह (Hoshiarpur)९ जिल्ह्यांना (Punjab)आठवडाभरापासून पुराने (Floods Grip)वेढा घातला आहे. तेराशेहून अधिक गावांतील अडीच लाखांहून अधिक लोकांना याचा फटका बसला. आतापर्यंत २९ जणांचा मृत्यू झाला. पंजाबसोबतच उत्तराखंड, जम्मू काश्मीर, हरयाणा या राज्यांनाही पावसाने झोडपले. दरम्यान, दरड कोसळल्यामुळे वैष्णोदेवी मंदिर ७ दिवसांपासून बंद आहे. उत्तराखंडमधील सर्व शाळांनाही सुट्टी देण्यात आली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज उच्चस्तरीय बैठकीत पूरस्थितीचा आढावा घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi)यांनी सोमवारी रात्री फोनवर बातचीत करत मुख्यमंत्री मान यांना केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करील, अशी हमी दिली. पंजाबमधील पूरस्थितीमुळे शेजारच्या हरयाणातील परिस्थितीही गंभीर होत आहे.
दोन्ही राज्यांतून वाहणाऱ्या नद्या धोक्याच्या पातळीवर आहेत. हरयाणात गेल्या तीन दिवसांपासून अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती आहे. त्यामुळे शाळांना सुट्टीही देण्यात आली आहे. राज्याचे आर्थिक केंद्र असलेल्या गुरुग्राममधील खासगी कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचा आदेश दिला आहे. वैष्णोदेवी यात्रा मार्गावर २६ ऑगस्टला दरड कोसळल्याने शेकडो भाविक कटरा येथे अडकले आहेत. यात्रा मार्गावर दुरुस्तीचे काम सुरू असल्याने वैष्णोदेवी मंदिर ७ दिवसांपासून बंद आहे. दुरुस्ती काम पूर्ण झाल्यानंतरच यात्रा पूर्ववत होईल, असे वैष्णोदेवी मंदिर समिती व्यवस्थापनाने सांगितले.
गृहमंत्री अमित शाह पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी सोमवारी श्रीनगरला पोहोचले. उत्तराखंडमधील सर्व १३ जिल्ह्यांतील शाळा-कॉलेजला सुट्टी देण्यात आली. केदारनाथ मार्गावर भुस्खलन झाल्याने दोघांचा जीव गेला. मुसळधार पावसामुळे चारधाम यात्रा ५ सप्टेंबरपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशातही आठ जिल्ह्यांत शाळा-कॉलेजला सुट्टी देण्यात आली आहे. वैष्णोदेवी यात्रा मार्गावर २६ ऑगस्टला दरड कोसळल्याने शेकडो भाविक कटरा येथे अडकले आहेत. अडकलेल्या ५०० यात्रेकरूंना हॉटेलचालकांनी राहण्याची मोफत सुविधा उपलब्ध करून दिली. तसेच मोफत जेवणही दिले जात आहे. यात्रा मार्गावर दुरुस्तीचे काम सुरू असल्याने वैष्णोदेवी मंदिर ७ दिवसांपासून बंद आहे. दुरुस्ती काम पूर्ण झाल्यानंतरच यात्रा पूर्ववत होईल, असे वैष्णोदेवी मंदिर समिती व्यवस्थापनाने सांगितले.
ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा
हे देखील वाचा –
बलात्काराचे आरोपी निर्दोष सुटले सुप्रीम कोर्टाने पुन्हा गजाआड केले
तुम्हाला कन्नड येते का? राष्ट्रपतींना कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची विचारणा
पंतप्रधान मोदी ‘या’ तारखेला मणिपूरला भेट देण्याची शक्यता’; हिंसाचारानंतर पहिला संभाव्य दौरा