Home / लेख / Flipkart सेलमध्ये ‘या’ 5 स्मार्टफोन्सवर मिळणार मोठी सूट; वाचा संपूर्ण माहिती

Flipkart सेलमध्ये ‘या’ 5 स्मार्टफोन्सवर मिळणार मोठी सूट; वाचा संपूर्ण माहिती

Flipkart Big Billion Days Sale

Flipkart Big Billion Days Sale: तुम्ही जर नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर काही दिवस वाट पाहा. फ्लिपकार्टवर ‘बिग बिलियन डेज 2025’ सेल याच महिन्यात सुरू होणार आहे. या सेलमध्ये अनेक डिव्हाइसेसवर भरघोस सूट दिली जाणार आहे. येथे आम्ही टॉप-5 स्मार्टफोन डीलबद्दल माहिती देत आहोत.

Samsung Galaxy S24

Samsung चा फ्लॅगशिप फोन सेलदरम्यान 40,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत ऑर्डर करता येईल. हा फोन गेल्या वर्षी 79,999 रुपयांना लाँच झाला होता. यामुळे ग्राहकांना या फोनची कमी किमतीत चांगली व्हॅल्यू मिळेल. मात्र, ही ऑफर मर्यादित वेळेसाठीच असेल.

Google Pixel 9 Series

Google Pixel 10 सिरीज नुकतीच लाँच झाली आहे. त्यामुळे Pixel 9 सिरीजवर ग्राहकांना खास सूट मिळेल. या सिरीजमधील Pixel 9, Pixel 9 Pro आणि Pixel 9 Pro XL हे फोन आजपर्यंतच्या सर्वात कमी किमतीत उपलब्ध होण्याची शक्यता आहे. यावर खास कार्ड डिस्काउंटही दिला जाईल.

iPhone 16

Apple ची नवीन iPhone 17 सिरीज 9 सप्टेंबरला लाँच होत आहे. त्यामुळे प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही iPhone वर सर्वात आकर्षक ऑफर्स मिळण्याची शक्यता आहे. विशेषतः iPhone 16 हे यामध्ये ठळकपणे दिसू शकते. हा फोन ऑफरसह 70,000 रुपये किंवा त्याहून कमी, म्हणजे 60,000 रुपयांच्या आत मिळू शकतो, असा दावा केला जात आहे.

Samsung Galaxy S24 FE

Samsung चा मागील ‘फॅन एडिशन’ स्मार्टफोन 59,999 रुपयांना लाँच झाला होता. मात्र, फ्लिपकार्ट सेलदरम्यान हा फोन 35,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळू शकतो. हा स्मार्टफोन प्रीमियम-एंड प्रोसेसर आणि शक्तिशाली कॅमेरा सेटअपसह येतो.

Poco X7 Pro

Poco स्मार्टफोन मिडरेंज सेगमेंटमध्ये खूप लोकप्रिय आहे. या स्मार्टफोनची किंमत सध्या 27,999 रुपये आहे, परंतु सेलदरम्यान ती 20,000 रुपयांपेक्षा कमी होईल.


ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा


हे देखील वाचा –

प्रताप सरनाईक यांनी खरेदी केलेल्या भारतातील पहिल्या टेस्ला कारची किंमत किती? काय आहे खास? जाणून घ्या

जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रीय चिन्हाचा अवमान; हजरतबल दर्ग्यातील अशोक स्तंभ असलेल्या फलकाची तोडफोड