Home / क्रीडा / रोहित-विराट लवकरच मैदानात परतणार? ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी ‘या’ सामन्यात खेळताना दिसण्याची शक्यता

रोहित-विराट लवकरच मैदानात परतणार? ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी ‘या’ सामन्यात खेळताना दिसण्याची शक्यता

Rohit Kohli Comeback: रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) हे दोघेही गेल्याकाही दिवसांपासून क्रिकेटच्या मैदानापासून लांब आहेत....

By: Team Navakal
Rohit Kohli Comeback

Rohit Kohli Comeback: रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) हे दोघेही गेल्याकाही दिवसांपासून क्रिकेटच्या मैदानापासून लांब आहेत. चाहते त्यांना पुन्हा एकदा निळ्या जर्सीमध्ये खेळताना पाहण्यास उत्सुक आहेत.

हे दोघेही क्रिकेटपटू ऑस्ट्रेलियाच्या आगामी व्हाईट-बॉल दौऱ्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परततील अशी अपेक्षा आहे. या दौऱ्यात भारतीय संघ तीन एकदिवसीय आणि तेवढ्याच T20 सामन्यांमध्ये खेळणार आहे. मात्र, हे दोन्ही दिग्गज खेळाडू ऑस्ट्रेलियाविरुद्ध परदेशात जाण्यापूर्वीच मैदानात अतरण्याची शक्यता आहे.

काही दिवसांतच ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघ भारतात दाखल होणार आहे, जिथे ते भारत ‘अ’ संघाविरुद्ध दोन अनधिकृत कसोटी आणि तीन एकदिवसीय सामने खेळतील. BCCI ने आधीच लखनऊमध्ये पुढील आठवड्यापासून सुरू होणाऱ्या कसोटी सामन्यांसाठी श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाची घोषणा केली आहे आणि आता लवकरच एकदिवसीय सामन्यांसाठीही घोषणा होणे अपेक्षित आहे.

रोहित-कोहली यांचा घरच्या मैदानावर पुनरागमनाचा अंदाज

हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार, रोहित आणि कोहली या दोघांचीही 30 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर दरम्यान कानपूरमध्ये होणाऱ्या तीन वनडे सामन्यांसाठी निवड होण्याची शक्यता आहे.

या वर्षीच्या सुरुवातीला UAE मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये या दोघांनी शेवटचे भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. या दोन सुपरस्टार्सनी गेल्या वर्षी T20 विश्वचषक जिंकल्यावर T20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती, तसेच मे महिन्यात त्यांनी कसोटी क्रिकेटमधूनही निवृत्तीची घोषणा केली होती. त्यामुळे चाहते त्यांना पुन्हा एकदा मैदानावर खेळताना पाहण्यास उत्सुक आहेत.

दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये तीन वनडे सामने खेळले जाणार आहेत. ऑस्ट्रेलियाविरूद्ध होणाऱ्या मालिकेतील पहिला सामना 19 ऑक्टोबर, दुसरा सामना 23 ऑक्टोबर आणि तिसरा सामना 25 ऑक्टोबरला खेळला जाईल.


ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा


हे देखील वाचा – 

कर्करोगाच्या उपचारात क्रांती; रशियाने आणली नवीन ‘ही’ विशेष लस

ओबीसींच्या विरोधात जरांगेंच्या समर्थकाचा कोर्टात कॅव्हेट दाखल

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या