Asia Cup 2025: आशिया कप 2025 स्पर्धेला आजपासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँग या संघांमध्ये खेळला जाईल. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ आशिया कप 2025 च्या आपल्या प्रवासाला उद्यापासून (10 सप्टेंबर) पासून सुरुवात करेल.
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये भारताचा पहिला सामना यजमान संयुक्त अरब अमिराती (UAE) संघाशी होणार आहे. विक्रमी नववे एशिया कप विजेतेपद पटकावण्याच्या निर्धाराने भारतीय संघ मैदानात उतरणार आहे.
भारतीय संघ विराट कोहली आणि रोहित शर्मा यांसारख्या दिग्गज खेळाडूंच्या अनुपस्थितीतही मैदानात उतरत आहे. तरीही, 8 वेळा विजेतेपद पटकावल्यामुळे भारतच या स्पर्धेतील सर्वात प्रबळ दावेदार मानला जात आहे.
Asia Cup 2025: भारताचे वेळापत्रक
10 सप्टेंबरला UAE विरुद्धच्या सलामीच्या सामन्यानंतर, भारताची सर्वात मोठी कसोटी 14 सप्टेंबर रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. हा सामनाही दुबईमध्येच होईल.
त्यानंतर, भारताचा गट फेरीतील शेवटचा सामना 19 सप्टेंबर रोजी ओमान विरुद्ध अबुधाबीमधील शेख झायेद स्टेडियमवर खेळला जाईल. हे सर्व सामने भारतीय वेळेनुसार रात्री 8:00 वाजता सुरू होतील.
Asia Cup 2025: स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक
- 9 सप्टेंबर: अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँग, गट बी, अबुधाबी.
- 10 सप्टेंबर: भारत विरुद्ध संयुक्त अरब अमिराती, गट ए, दुबई.
- 11 सप्टेंबर: बांगलादेश विरुद्ध हाँगकाँग, गट बी, अबुधाबी.
- 12 सप्टेंबर: पाकिस्तान विरुद्ध ओमान, गट ए, दुबई.
- 13 सप्टेंबर: बांगलादेश विरुद्ध श्रीलंका, गट बी, अबुधाबी.
- 14 सप्टेंबर: भारत विरुद्ध पाकिस्तान, गट ए, दुबई.
- 15 सप्टेंबर: संयुक्त अरब अमिराती विरुद्ध ओमान, गट ए, अबुधाबी.
- 15 सप्टेंबर: श्रीलंका विरुद्ध हाँगकाँग, गट बी, दुबई.
- 16 सप्टेंबर: बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान, गट बी, अबुधाबी.
- 17 सप्टेंबर: पाकिस्तान विरुद्ध संयुक्त अरब अमिराती, गट ए, दुबई.
- 18 सप्टेंबर: श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान, गट बी, अबुधाबी.
- 19 सप्टेंबर: भारत विरुद्ध ओमान, गट ए, अबुधाबी.
- 20 सप्टेंबर: सुपर फोर, सामना 1, दुबई.
- 21 सप्टेंबर: सुपर फोर, सामना 2, दुबई.
- 23 सप्टेंबर: सुपर फोर, सामना 3, अबुधाबी.
- 24 सप्टेंबर: सुपर फोर, सामना 4, दुबई.
- 25 सप्टेंबर: सुपर फोर, सामना 5, दुबई.
- 26 सप्टेंबर: सुपर फोर, सामना 6, दुबई.
- 28 सप्टेंबर: अंतिम सामना, दुबई.
Asia Cup 2025: भारतीय संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, संजू सॅमसन, हर्षित राणा, रिंकू सिंग.
थेट प्रक्षेपण (Asia Cup 2025 Live Streaming)
या स्पर्धेतील सर्व सामने सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपित केले जातील. तसेच, चाहते सोनी लिव्ह ॲप आणि वेबसाइटवर सामन्यांचे थेट प्रक्षेपण पाहू शकतील.
हे देखील वाचा –
काशी विश्वनाथ मंदिर कर्मचारी राज्य सेवक दर्जा ! पगार तिपटीने वाढणार