Home / मनोरंजन / अरे बापरे! केसातील गजऱ्यामुळे भारतीय अभिनेत्रीला ऑस्ट्रेलियात मोठा दंड; काय घडलं जाणून घ्या

अरे बापरे! केसातील गजऱ्यामुळे भारतीय अभिनेत्रीला ऑस्ट्रेलियात मोठा दंड; काय घडलं जाणून घ्या

Navya Nair: भारतीय महिलांसाठी केसात गजरा माळणे ही अत्यंत सामान्य आणि पारंपरिक गोष्ट आहे. पण, एका मल्याळम अभिनेत्रीसाठी हेच प्रकरण...

By: Team Navakal
Navya Nair

Navya Nair: भारतीय महिलांसाठी केसात गजरा माळणे ही अत्यंत सामान्य आणि पारंपरिक गोष्ट आहे. पण, एका मल्याळम अभिनेत्रीसाठी हेच प्रकरण खूप महाग पडले आहे.

ऑस्ट्रेलियाच्या कठोर जैवसुरक्षा नियमांमुळे भारतीय अभिनेत्री नव्या नायर यांना तब्बल 1.25 लाख रुपयांचा मोठा दंड भरावा लागला आहे. त्यांनी आपल्यासोबत आणलेल्या फुलांची माहिती दिली नव्हती, त्यामुळे त्यांना अधिकाऱ्यांनी दंड ठोठावला.

ही घटना मेलबर्न आंतरराष्ट्रीय विमानतळावर घडली. नव्या यांना ओणम कार्यक्रमासाठी नव्या नायर यांना आमंत्रित केले होते. त्यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात सांगितले की, कोची येथून निघताना त्यांच्या वडिलांनी त्यांच्यासाठी जाईची फुले आणली होती. त्यांनी एक वेणी केसांमध्ये घातली होती, तर दुसरी हँडबॅगमध्ये ठेवली.

याच फुलांची माहिती न दिल्याने त्यांना मेलबर्न विमानतळावर थांबवून दंड ठोठावण्यात आला.

ऑस्ट्रेलियाचे कठोर जैवसुरक्षा नियम

ऑस्ट्रेलियामध्ये कृषी उद्योगांचे संभाव्य धोक्यांपासून संरक्षण करण्यासाठी कठोर जैवसुरक्षा नियम लागू आहे. त्यामुळे, देशात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांना त्यांच्याकडील कोणत्याही वनस्पती किंवा खाद्यपदार्थांची ‘इनकमिंग पॅसेंजर कार्ड’वर घोषणा करणे अनिवार्य आहे.

असे करण्यात अपयश आल्यास AUD 6,600 पर्यंत दंड, फौजदारी खटला किंवा व्हिसा रद्द करण्याची कारवाई केली जाऊ शकते. नव्या नायर यांनी 28 दिवसांच्या आत दंडाची रक्कम भरली आणि ही घटना आपल्यासाठी एक शिकवण असल्याचे म्हटले आहे.


हे देखील वाचा –

‘Krrish 4’ कधी रिलीज होणार? राकेश रोशन यांनी दिली महत्त्वाची माहिती

‘Gen Z’ च्या आंदोलनानंतर नेपाळ सरकारचा मोठा निर्णय, सोशल मीडियावरील बंदी अखेर उठवली

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या