Home / देश-विदेश / भारत-अमेरिका संबंधांमध्ये सुधारणांचे संकेत, ट्रम्प यांच्याकडून ‘प्रिय मित्र मोदी’ म्हणत ट्विट; पंतप्रधान म्हणाले…

भारत-अमेरिका संबंधांमध्ये सुधारणांचे संकेत, ट्रम्प यांच्याकडून ‘प्रिय मित्र मोदी’ म्हणत ट्विट; पंतप्रधान म्हणाले…

India US Trade Deal: गेल्याकाही दिवसांपासून भारत-अमेरिकेतील ताणलेले संबंध आता सुधारताना दिसत आहे. ट्रम्प यांनी भारत-अमेरिका संबंधाविषयी केलेल्या ट्विटला प्रतिसाद...

By: Team Navakal
India US Trade Deal

India US Trade Deal: गेल्याकाही दिवसांपासून भारत-अमेरिकेतील ताणलेले संबंध आता सुधारताना दिसत आहे. ट्रम्प यांनी भारत-अमेरिका संबंधाविषयी केलेल्या ट्विटला प्रतिसाद देत मोदी यांनी ‘भारत आणि अमेरिका नैसर्गिक भागीदार’ असल्याचे म्हटले आहे.

ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये पंतप्रधान मोदी यांचा उल्लेख “प्रिय मित्र” असा केला. तसेच, दोन्ही देशातील ठप्प झालेल्या व्यापार वाटाघाटींना नवीन गती देण्याचे संकेत दिले . दोन्ही देशांमधील व्यापार करारावर चर्चा करण्याची सहमती दर्शवली होती.

ट्रम्प यांच्या पोस्टला उत्तर देत मोदी यांनी ‘X’ (ट्विटर) वर लिहिले, “भारत आणि अमेरिका जवळचे मित्र आणि नैसर्गिक भागीदार आहेत. मला विश्वास आहे की, आमच्या व्यापार वाटाघाटी भारत-अमेरिका भागीदारीच्या अमर्याद क्षमतेला अनलॉक करण्याचा मार्ग मोकळा करतील. या चर्चा लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आमचे अधिकारी काम करत आहेत.”

ट्रम्प यांनी त्यांच्या ‘ट्रूथ सोशल’वरील पोस्टमध्ये भारतासोबतच्या व्यापार वाटाघाटी सुरू असल्याचे म्हटले होते आणि भविष्यात यशस्वी तोडगा निघेल, असा आशावाद व्यक्त केला होता.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी मोदी यांची पोस्ट ‘ट्रूथ सोशल’वर पुन्हा शेअर केली आणि लिहिले, “मला खात्री आहे की, आपल्या दोन्ही महान देशांसाठी यशस्वी तोडगा काढण्यात कोणतीही अडचण येणार नाही!” लवकरच पंतप्रधान मोदी यांच्याशी बोलण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

तणावानंतर संबंधांमध्ये सुधारणेचे संकेत

एकीकडे व्यापार करारावर सहमती होत नसताना अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ लावले होते. त्यामुळे दोन्ही देशातील तणाव वाढला होता. याशिवाय, अमेरिकेच्या प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून वारंवार भारतविरोधी वक्तव्य देखील केली जात होती. मात्र, आता ट्रम्प-मोदी यांच्या ट्विटनंतर दोन्ही देशातील संबंधांमध्ये सुधारणेचे संकेत मिळत आहे.

ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी वापरलेल्या कठोर शब्दांच्या तुलनेत त्यांच्या या भूमिकेमुळे मोठा बदल दिसून येतो. या महिन्याच्या सुरुवातीला शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) परिषदेतील छायाचित्रांमध्ये पंतप्रधान मोदी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत दिसत असल्यामुळे वॉशिंग्टनने भारतावर टीका केली होती.

दरम्यान, दोन्ही देशातील व्यापार कराराविषयीची चर्चा पुन्हा एकदा सुरू होण्याची शक्यता आहे. या चर्चेसाठी भारतीय शिष्टमंडळ अमेरिकेला जाण्याची शक्यता आहे.


हे देखील वाचा –

नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळाले नाहीत? ‘या’ सोप्या पद्धतीने लगेच चेक करा स्टेटस 

अखेर iPhone 17 सिरीज लाँच! किती आहे भारतातील किंमत, काय आहे खास? जाणून घ्या सर्व माहिती

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या