Thar Accident: नवीन गाडी खरेदी केल्याचा आनंद आणि पूजा करण्याचा उत्साह काही वेगळाच असतो. पण गाडी खरेदी केल्या केल्याच अपघात झाला तर? नवीन गाडी खरेदी केल्यावर सर्वसाधारणपणे लिंबू चाकाखाली चिरडले जाते. मात्र, हेच करणे एका महिलेला चांगलेच महागात पडले.
दिल्लीत एका महिलेची नवीन Mahindra Thar थेट शोरूमच्या पहिल्या मजल्यावरून खाली कोसळली. लिंबू चिरडण्याच्या नादात हा अपघात घडला. महिलेने चुकून ब्रेकऐवजी अॅक्सिलेटर दाबल्याने गाडी थेट पहिल्या मजल्यावरून खाली कोसळली.
नेमके काय घडले?
29 वर्षीय माणी पवार दिल्लीतील निर्मान विहार येथील Mahindra शोरूममध्ये आपली नवीन 27 लाखांची Thar घेण्यासाठी गेल्या होत्या. गाडी शोरूममधून बाहेर काढण्याआधी त्यांनी लिंबू चिरडण्याचा पारंपरिक विधी करण्याचा निर्णय घेतला.
शोरूमच्या पहिल्या मजल्यावर उभी असलेली Thar थोडी पुढे सरकवून लिंबू चिरडायचे होते, पण माणी पवार यांनी चुकून अॅक्सिलेटर दाबला.
She Wanted To Crush Lemon With Thar, SUV Flew Out Of Showroom's 1st Floor https://t.co/zKRI5ngj2E pic.twitter.com/O9BBNHhuwO
— NDTV (@ndtv) September 10, 2025
गाडी वेगात पुढे गेल्यामुळे शोरूमची काच तोडून ती थेट खाली रस्त्यावर कोसळली. या वेळी गाडीत माणी पवार आणि विकास नावाचा एक शोरूम कर्मचारी उपस्थित होता. या घटनेनंतर गाडी रस्त्यावर उलटलली.
सुदैवाने, गाडीचे एअरबॅग्ज त्वरित उघडले, ज्यामुळे दोघांनाही गंभीर दुखापत झाली नाही. दोघांनाही जवळच्या मलिक हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आणि प्रथमोपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले.
हे देखील वाचा – IPS Anjana Krishna: ‘त्यानंतर मला…’; अजित पवारांना भिडणाऱ्या अंजना कृष्णांच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया