Jeep India Price Drop: नुकत्याच झालेल्या GST सुधारणांनंतर Jeep India ने आपल्या सर्व मॉडेल्सच्या किमती कमी करण्याची घोषणा केली आहे. 22 सप्टेंबर 2025 पासून कंपनी सुधारित GST दरांचा पूर्ण लाभ ग्राहकांना देणार आहे, ज्यामुळे त्यांच्या गाड्या भारतीय ग्राहकांसाठी अधिक स्वस्त होतील.
Compass, Meridian, Wrangler, आणि Grand Cherokee या मॉडेल्सच्या एक्स-शोरूम किमती व्हेरियंटनुसार 1.26 लाख ते सुमारे 4.8 लाख रुपयांपर्यंत कमी होणार आहेत.
Jeep India Price Drop: GST कपातीचा Jeep च्या मॉडेल्सवर होणारा परिणाम
मॉडेल | नवीन GST दर | GST बचत |
Compass | 40% | ₹2.16 लाख पर्यंत |
Meridian | 40% | ₹2.47 लाख पर्यंत |
Wrangler | 40% | ₹4.84 लाख पर्यंत |
Grand Cherokee | 40% | ₹4.50 लाख पर्यंत |
या गाड्याही होणार स्वस्त, तर काही महाग
22 सप्टेंबर 2025 पासून लहान कार, 350cc पर्यंतच्या मोटरसायकल, तीनचाकी, बस, ट्रक आणि रुग्णवाहिकांवरील GST 28% वरून 18% पर्यंत कमी होईल. यामुळे Maruti Suzuki Alto, Hyundai Grand i10 आणि Tata Tiago सारख्या किफायतशीर कारच्या किमती 10% पर्यंत कमी होऊ शकतात. तर Honda Shine, Bajaj Pulsar, Honda Activa, आणि Hero Splendour यांसारख्या मोटरसायकलही स्वस्त होतील.
GST कौन्सिलने ऑटो पार्ट्सवर एकसमान 18% कर लागू केला आहे, ज्यामुळे कर प्रणाली सोपी झाली आहे. 1,200cc पर्यंतच्या पेट्रोल आणि 1,500cc पर्यंतच्या डिझेल (लांबी 4,000mm पर्यंत) या लहान कारना कमी दराचा फायदा होणार आहे.
याउलट, लक्झरी कार, मोठ्या SUVs (4,000mm पेक्षा जास्त लांब, पेट्रोल 1,200cc पेक्षा जास्त, डिझेल 1,500cc पेक्षा जास्त) आणि 350cc पेक्षा जास्त क्षमतेच्या मोटरसायकलवर आता 40% GST लागणार आहे, ज्यामुळे Royal Enfield 650cc, KTM 390, आणि Harley Davidson मोटरसायकलसारख्या गाड्यांच्या किमती वाढणार आहेत.
याशिवाय, शेतीत वापरल्या जाणाऱ्या ट्रॅक्टर, मशागत यंत्रसामग्री, हार्वेस्टर, थ्रेशर, आणि तत्सम अवजारांवरील GST 12% वरून 5% पर्यंत कमी करण्यात आला आहे, ज्यामुळे कृषी क्षेत्राला मोठा फायदा होणार आहे.
हे देखील वाचा – Asia Cup 2025: भारत आणि UAE मधील सामना कुठे आणि कधी पाहता येईल? जाणून घ्या