Home / देश-विदेश / Rahul go back : रायबरेलीत भाजपा मंत्र्याने राहुल गांधींचा ताफा रोखला

Rahul go back : रायबरेलीत भाजपा मंत्र्याने राहुल गांधींचा ताफा रोखला

Rahul go back : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी ( Rahul Gandhi) यांना आज रायबरेली होते.या रायबरेली दौऱ्यावेळी त्यांना विरोधाला...

By: Team Navakal
Rahul go back

Rahul go back : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी ( Rahul Gandhi) यांना आज रायबरेली होते.या रायबरेली दौऱ्यावेळी त्यांना विरोधाला सामोरे जावे लागले. उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) सरकारमधील मंत्री दिनेश सिंह (Dinesh Singh) यांनी भाजपा (BJP) कार्यकर्त्यांसह रस्त्यातच ठिय्या दिला. राहुल परत जा (Rahul go back) अशा घोषणा दिल्या. बिहारमध्ये मतदार हक्क यात्रेदरम्यान एका कार्यकर्त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या आईबद्दल अपशब्द वापरल्या प्रकरणी राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी सिंह यांनी केली.

खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी राहुल गांधी यांचा ताफा एक किलोमीटर दूर अंतरावर थांबवला. पोलिसांनी मंत्री दिनेश सिंह यांना रस्त्यावरून बाजूला करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा भाजप कार्यकर्त्यांशी धक्काबुक्कीही झाली. दरम्यान, राहुल गांधी हे आज आणि उद्या असे दोन दिवस रायबरेली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते काँग्रेस पक्षाच्या बूथ पातळीवरील कार्यकर्त्यांचा मेळावा तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत मतदारसंघातील कामकाजासंदर्भात बैठकाही घेणार आहेत. वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्येही सहभागी होणार आहेत.

राहुल गांधी आज सकाळीच दिल्लीहून विमानाने लखनौ विमानतळावर पोहोचले. त्यानंतर रस्ता मार्गे रायबरेलीला रवाना झाले. हरचंदपूर येथे आपला ताफा थांबवून त्यांनी समाजवादी पार्टीच्या नेत्यांशी चर्चा केली. बटोही विश्रामगृहाकडे जात असताना भाजपा मंत्र्याने रस्त्यातच ठिय्या दिला. पोलिसांनी समजूत घालून कॅबिनेट मंत्री दिनेश सिंह यांना महामार्गावरून बाजूला नेले. यामुळे राहुल गांधी यांचा ताफा पाच मिनिटे रोखून धरण्यात आला. त्यानंतर राहुल गांधींचा ताफा बटोही विश्रामगृहावर पोहोचला. नंतर ते वेगवेगळ्या नियोजित कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले. दरम्यान, २०२४ मध्ये लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर राहुल गांधी यांचा हा गेल्या दीड वर्षांतला सहावा रायबरेली दौरा आहे. याआधी २९ आणि ३० एप्रिलला ते रायबरेलीला गेले होते.


हे देखील वाचा –

राजस्थान रॉयल्सच्या सीईओंचाही राजीनामा

संतोष देशमुख प्रकरणी आरोपींच्या दोषमुक्ती अर्जावर युक्तिवाद पूर्ण

पंजाबमधील दोन हजार गावे अजूनही पुराच्या विळख्यात

Web Title:
संबंधित बातम्या