Home / लेख / सणासुदीच्या तोंडावर Hero ची मोठी घोषणा, Splendor ची किंमत केली खूपच कमी; पाहा डिटेल्स

सणासुदीच्या तोंडावर Hero ची मोठी घोषणा, Splendor ची किंमत केली खूपच कमी; पाहा डिटेल्स

Hero Splendor Price Cut: जीएसटी स्लॅब्समधील बदलांमुळे वाहन कंपन्यांनी गाड्यांच्या किंमतीत मोठी कपात केली आहे. भारताची सर्वात मोठी दुचाकी उत्पादक...

By: Team Navakal
Hero Splendor Price Cut

Hero Splendor Price Cut: जीएसटी स्लॅब्समधील बदलांमुळे वाहन कंपन्यांनी गाड्यांच्या किंमतीत मोठी कपात केली आहे. भारताची सर्वात मोठी दुचाकी उत्पादक कंपनी Hero MotoCorp ने आपल्या ग्राहकांना एक आनंदाची बातमी दिली आहे.

कंपनीने GST 2.0 चा पूर्ण फायदा ग्राहकांना देण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे Hero च्या सर्व बाईक आणि स्कूटरच्या किमतीत मोठी कपात होणार आहे.

22 सप्टेंबर 2025 पासून हे नवीन दर लागू होतील. नवरात्री आणि दिवाळीसारख्या सणांच्या काळात दुचाकींची खरेदी मोठ्या प्रमाणात होते, त्यामुळे कंपनीचा हा निर्णय योग्य वेळी आला आहे.


कोणत्या बाईक आणि स्कूटर किती स्वस्त झाल्या?

Hero च्या लोकप्रिय बाईक्स आणि स्कूटर आता 5,800 ते 15,700 रुपयांपर्यंत स्वस्त मिळणार आहेत. कंपनीने प्रत्येक सेगमेंटमध्ये किमती कमी केल्या आहेत. लहान स्कूटरपासून ते 125cc बाईक आणि प्रीमियम मॉडेल्सपर्यंत, सगळ्या ग्राहकांना याचा फायदा होईल.

सर्वात जास्त फायदा Karizma 210 वर मिळत आहे, ज्याची किंमत तब्बल 15,743 रुपयांनी कमी झाली आहे. त्यानंतर Xpulse 210 वर 14,516 रुपयांचा फायदा मिळणार आहे. याशिवाय, सर्वसामान्यांची आवडती Splendor+ 6,820 रुपये आणि HF Deluxe 5,805 रुपयांनी स्वस्त झाल्या आहेत. त्यामुळे, जर तुम्ही या सणांमध्ये नवीन बाईक घेण्याचा विचार करत असाल, तर ही एक उत्तम संधी आहे.

Hero बाईकच्या किमतीतील GST कपात

मॉडेलकिती स्वस्त?
Splendor+₹6,820
Passion+₹6,500
HF Deluxe₹5,805
Super Splendor XTEC₹7,254
Glamour X₹7,813
Karizma 210₹15,743
Xpulse 210₹14,516
Xtreme 125R₹8,010
Xtreme 160R 4V₹10,985
Xtreme 250R₹14,055
Destini 125₹7,197
Pleasure+₹6,417
Xoom 110₹6,597
Xoom 125₹7,291
Xoom 160₹11,602

हे देखील वाचा –

Malegaon bomb blast : मालेगाव बॉम्बस्फोट निकालाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या