Home / लेख / चक्क निम्म्या किंमतीत मिळतोय Google Pixel 9; आतापर्यंतच्या सर्वात कमी किंमतीत खरेदीची संधी

चक्क निम्म्या किंमतीत मिळतोय Google Pixel 9; आतापर्यंतच्या सर्वात कमी किंमतीत खरेदीची संधी

Google Pixel 9: Google च्या चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. गेल्या वर्षी Tensor G4 SoC प्रोसेसरसह लाँच झालेला Google...

By: Team Navakal
Google Pixel 9

Google Pixel 9: Google च्या चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. गेल्या वर्षी Tensor G4 SoC प्रोसेसरसह लाँच झालेला Google Pixel 9 स्मार्टफोन आता Flipkart Big Billion Days Sale 2025 मध्ये आपल्या मूळ किमतीच्या निम्म्याहून कमी दरात मिळणार आहे.

या सेलमध्ये या फोनवर EMI आणि एक्सचेंज डिस्काउंटसारख्या खास ऑफर्सही उपलब्ध असतील.

Google Pixel 9 ची किंमत 35,000 रुपयांपेक्षा कमी

Flipkart ने ॉGoogle Pixel 9 च्या सेलची किंमत अधिकृतपणे जाहीर केली आहे. या फोनची सुरुवातीची किंमत 37,999 रुपये असेल. यावर इतर ऑफरचा देखील फायदा मिळाल्यास फोनची किंमत 35 हजारां रुपयांपेक्षा कमी होईल. ही किंमत 12GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंटच्या 79,999 रुपयांच्या लाँच किमतीपेक्षा खूपच कमी आहे.

सध्या हा फोन ऑनलाइन मार्केटमध्ये 64,999 रुपयांना विकला जात आहे. Flipkart Big Billion Days सेलमध्येच या फोनला इतकी मोठी सूट पहिल्यांदाच मिळणार आहे.

Flipkart Plus आणि Black सदस्यांसाठी हा सेल 22 सप्टेंबरपासून सुरू होईल, तर इतर सर्व ग्राहकांसाठी तो 23 सप्टेंबरपासून खुला होईल. Google व्यतिरिक्त Apple, Samsung आणि Motorola सारख्या कंपन्याही iPhone 16 Pro Max, Samsung Galaxy S24 आणि Motorola Edge 60 Pro सारख्या त्यांच्या फ्लॅगशिप मॉडेल्सवर मोठी सूट देणार आहेत.

Google Pixel 9 मध्ये काय आहे खास?

  • डिस्प्ले: 6.3 इंच डिस्प्ले.
  • प्रोसेसर: Tensor G4 प्रोसेसर आणि Titan M2 सिक्युरिटी को-प्रोसेसर.
  • बॅटरी: 4,700mAh बॅटरी, जी 45W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
  • कॅमेरा: यात ड्युअल रियर कॅमेरा सेटअप असून, 50 मेगापिक्सलचा वाइड-अँगल कॅमेरा आहे. समोर 10.5 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
  • सुरक्षा: हा फोन IP68 रेटिंगसह येतो, ज्यामुळे तो पाणी आणि धुळीपासून सुरक्षित राहतो.
  • रंग: Peony, Porcelain, Obsidian, आणि Wintergreen या रंगांमध्ये फोन उपलब्ध आहे.

या सेलमध्ये Axis Bank आणि ICICI Bank च्या क्रेडिट कार्डवर अतिरिक्त सूट मिळू शकते. तसेच, नो-कॉस्ट EMI, एक्सचेंज डिस्काउंट आणि Super Coins सारखे ऑफर्सही उपलब्ध असतील.


हे देखील वाचा –

सत्तेसाठी रावण अहंकार दहन करा ! गणेश नाईकांचे वक्तव्य

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या