Home / देश-विदेश / चार्ली कर्क हत्या: एफबीआयकडून शूटरचा फोटो जारी; संशयिताचा शोध सुरू

चार्ली कर्क हत्या: एफबीआयकडून शूटरचा फोटो जारी; संशयिताचा शोध सुरू

Charlie Kirk Death News: अमेरिकेतील प्रसिद्ध तरुण राजकीय नेते आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे सहकारी चार्ली कर्क (Charlie Kirk Assassination)...

By: Team Navakal
Charlie Kirk Death News

Charlie Kirk Death News: अमेरिकेतील प्रसिद्ध तरुण राजकीय नेते आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे सहकारी चार्ली कर्क (Charlie Kirk Assassination) यांची सार्वजनिक कार्यक्रमात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. ही राजकीय हत्या असल्याचे म्हटले जात असून, आता एफबीआयने (FBI Hunt) तपास सुरू केला आहे.

युटा व्हॅली युनिव्हर्सिटी मध्ये सुरू असलेल्या एका कार्यक्रमात ही घटना घडली. एफबीआयने या प्रकरणात एका संशयिताचा फोटो जारी केला असून, हल्लेखोराचा शोध अजूनही सुरू आहे.

नेमके काय घडले?

31 वर्षांचे चार्ली कर्क हे रिपब्लिकन पक्षाला तरुण मतदारांचा पाठिंबा मिळवून देण्यासाठी ओळखले जात होते. युटा व्हॅली युनिव्हर्सिटीमध्ये “प्रुव्ह मी राँग” नावाच्या कार्यक्रमात ते व्यासपीठावरून बोलत असताना ही घटना घडली.

सुमारे तीन हजार लोकांच्या गर्दीसमोर एका छतावरून त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. गोळीबारानंतर हल्लेखोर जवळच्या वस्तीत पळून गेला. एफबीआयने या हत्येसाठी वापरण्यात आलेली रायफल जप्त केली असून, फॉरेन्सिक तपास सुरू आहे.चार्ली कर्क हे टर्निंग पॉइंट यूएसए या संस्थेचे सह-संस्थापक आणि अध्यक्ष होते.

युटा राज्याचे गव्हर्नर स्पेन्सर कॉक्स यांनी या हत्येला राजकीय हत्या म्हटले आहे. चार्ली कर्क यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु काही तासांतच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने देशभरात राजकीय हिंसेबद्दल संताप व्यक्त होत आहे.

चार्ली कर्क यांच्या हत्येनंतर अनेक दिग्गज नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर चार्ली कर्क यांना “एक उत्तम माणूस” म्हटले. तसेच, डोनाल्ड ट्रम्प यांनी चार्ली हे अमेरिकेतील तरुणांचे मन सर्वात जास्त समजून घेणारे व्यक्ती होते, असेही लिहिले. दरम्यान, आता एफबीआयकडून गोळी झाडणाऱ्या हल्लेखोराचा शोध घेतला जात आहे.


हे देखील वाचा – Charlie Kirk Death: चार्ली कर्क यांची अमेरिकेत हत्या, पण धक्का ट्रम्प यांना; असं का?

Web Title:
संबंधित बातम्या