Home / लेख / तब्बल दीड लाख रुपयांची कपात! टोयोटाची सर्वात लोकप्रिय गाडी झाली खूपच स्वस्त

तब्बल दीड लाख रुपयांची कपात! टोयोटाची सर्वात लोकप्रिय गाडी झाली खूपच स्वस्त

Toyota Innova Crysta Price Cut: जीएसटीतील स्लॅब्समध्ये बदल झाल्यानंतर सणासुदीच्या काळात वाहन विक्रेत्यांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. अनेक गाड्यांवरील...

By: Team Navakal
Toyota Innova Crysta Price Cut

Toyota Innova Crysta Price Cut: जीएसटीतील स्लॅब्समध्ये बदल झाल्यानंतर सणासुदीच्या काळात वाहन विक्रेत्यांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. अनेक गाड्यांवरील कर कमी होणार आहे. यापार्श्वभूमीवर कंपन्यांनी देखील किंमती कमी करण्याची घोषणा केली आहे.

सरकारने प्रवासी वाहनांवरील जीएसटी दरात केलेल्या बदलांनंतर टोयोटा कंपनीने ग्राहकांना याचा थेट लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे टोयोटा इनोव्हा क्रिस्टा आता अधिक परवडणारी झाली आहे. 22 सप्टेंबरपासून नवीन किमती लागू होणार असून, सणासुदीच्या काळात हा निर्णय बाजारात उत्साह वाढवेल अशी अपेक्षा आहे.

Toyota Innova Crysta Price Cut: किमतीत तब्बल दीड लाखांहून अधिकची घट

नवीन जीएसटी दर लागू झाल्यानंतर टोयोटा इनोव्हा क्रिस्टाच्या (Toyota Innova Crysta Price Cut) किमतीत मोठी घट झाली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, टॉप मॉडेल झेडएक्स 7एस टर्बो डिझेल-मॅन्युअलच्या किमतीत सर्वाधिक म्हणजे सुमारे 1.81 लाखा रुपयांपर्यंत कपात झाली आहे.

नवीन किमती केवळ जीएसटी कपातीमुळेच नाहीत, तर टोयोटाने जीएसटी लाभाव्यतिरिक्त काही अतिरिक्त सूटही दिली आहे. कंपनीने स्वतःच्या मार्जिनमध्ये देखील बदल केला आहे, ज्यामुळे ग्राहकांना अधिक आकर्षक किंमत मिळेल.

किंमतींची तुलना (संभाव्य)

खालील तक्त्यात तुम्ही इन्व्होव्हा क्रिस्टाच्या वेगवेगळ्या मॉडेल्सच्या जुन्या आणि नवीन किमतींमधील फरक पाहू शकता. या किमती 22 सप्टेंबर 2025 पासून लागू होतील.

2.4L टर्बो डिझेल-मॅन्युअल मॉडेल्स

मॉडेलजुनी किंमतकिमतीतील फरकनवीन किंमतटक्केवारीत फरक
GX 7S₹19,99,000– ₹1,33,000₹18,66,000– 6.65%
GX 8S₹19,99,000– ₹1,33,000₹18,66,000– 6.65%
GX Fleet 7S₹19,99,000– ₹1,33,000₹18,66,000– 6.65%
GX Fleet 8S₹19,99,000– ₹1,33,000₹18,66,000– 6.65%
GX Plus 7S₹21,71,000– ₹1,44,500₹20,26,500– 6.66%
GX Plus 8S₹21,76,000– ₹1,45,000₹20,31,000– 6.66%
VX 7S₹25,40,000– ₹1,69,000₹23,71,000– 6.65%
VX 8S₹25,45,000– ₹1,69,000₹23,76,000– 6.64%
ZX 7S₹27,08,000– ₹1,80,600₹25,27,400– 6.67%

हे देखील वाचा – श्रीमंतांच्या यादीत उलथापालथ! काही तासांसाठी मस्क पडले मागे; रात्रीत 101 अब्ज डॉलर कमावणारा हा माणूस कोण?

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या