iphone 17 India offers: जर तुम्हाला Appleचा नवीन iPhone 17 फोन फक्त दहा मिनिटांत खरेदी करायचा असेल, तर आता हे शक्य झाले आहे. क्विक कॉमर्स ॲप Blinkit ने iPhone 17 सिरीजचे फोन अवघ्या दहा मिनिटांत डिलिव्हरी देण्याची घोषणा केली आहे.
येत्या 19 सप्टेंबरपासून Blinkit ॲपवर या मॉडेल्सची डिलिव्हरी सुरू होईल, अशी माहिती कंपनीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट्सवरून दिली आहे.
iPhone 17 सिरीजची भारतातील किंमत (iPhone 17 Price in India)
Blinkit वर 12 सप्टेंबरपासून iPhone 17 सिरीजचे प्री-ऑर्डर सुरू झाले आहेत. ग्राहक मॉडेल, स्टोरेज आणि रंगानुसार आपला आवडता फोन ऑर्डर करू शकतात. सुरुवातीला ही सुविधा काही निवडक शहरांमध्ये उपलब्ध असेल.
मॉडेल | व्हेरियंट | किंमत |
iPhone 17 | 256GB | ₹82,900 |
iPhone 17 | 512GB | ₹1,02,900 |
iPhone 17 Pro | 256GB | ₹1,34,900 |
iPhone 17 Pro | 512GB | ₹1,54,900 |
iPhone 17 Pro | 1TB | ₹1,74,900 |
iPhone 17 Pro Max | 256GB | ₹1,49,900 |
iPhone 17 Pro Max | 512GB | ₹1,69,900 |
iPhone 17 Pro Max | 1TB | ₹1,89,900 |
iPhone 17 Pro Max | 2TB | ₹2,29,900 |
iPhone 17 Air | 256GB | ₹1,19,900 |
iPhone 17 Air | 512GB | ₹1,39,900 |
iPhone 17 Air | 1TB | ₹1,59,900 |
या सिरीजमध्ये iPhone 17 ची सुरुवातीची किंमत वाढली आहे. तसेच, बेस मॉडेलमध्ये 256GB स्टोरेज देण्यात आले आहे. iPhone 17 Pro आणि Pro Max च्या किमतीतही वाढ झाली आहे आणि आता Pro Max मध्ये 2TB चा नवीन व्हेरियंट उपलब्ध आहे.
iPhone 17 Series: नवीन फोन्समध्ये काय आहे खास?
iPhone 17 – हा फोन अधिक अपग्रेडेड फीचर्ससह येतो. यात 6.3 इंचाचा सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले आहे, जो 120 हर्ट्झ (120Hz) ProMotion ला सपोर्ट करतो. स्क्रीनची ब्राइटनेस 3000 निट्सपर्यंत असून यात Ceramic Shield 2 चे संरक्षण दिले आहे. फोन A19 चिपसेटवर चालतो आणि यात 48 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आहे.
iPhone 17 Pro आणि Pro Max – Pro मॉडेल्समध्ये A19 Pro चिपसेट देण्यात आला आहे. यात नवीन Vapour Chamber Cooling सिस्टीम आहे. iPhone 17 Pro मध्ये 6.3 इंच आणि Pro Max मध्ये 6.9 इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले मिळतो. दोन्हीमध्ये 120Hz ProMotion आणि 3000 ब्राइटनेसचा सपोर्ट आहे. यात 48 मेगापिक्सलचे तीन कॅमेरे आणि नवीन टेलीफोटो लेन्स असून, 8X ऑप्टिकल झूम आणि 40X डिजिटल झूम दिला आहे.
iPhone Air – iPhone Air हा एक eSIM-ओन्ली हँडसेट आहे आणि तो iOS 26 वर चालतो. हा आतापर्यंतचा सर्वात पातळ iPhone मॉडेल आहे. तो 80%रिसायकल केलेल्या टायटॅनियमपासून बनवला आहे. यात Pro मॉडेल्सप्रमाणेच A19 Pro SoC आहे. यात Wi-Fi 7, Bluetooth 6 आणि thread क्षमतांसाठी नवीन N1 चिप आहे, ज्यामुळे नेटवर्क स्पीड दुप्पट मिळतो. कॅमेऱ्यासाठी यात 48 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आहे.