Elphinstone Bridge – शिवडी-वरळी (Sewri–Worli) उन्नत मार्गामधील एलफिन्स्टन पूल आज मध्यरात्री वाहतुकीसाठी बंद केला जाणार असे जाहीर केलेले असताना या पुलाच्या पाडकामाला स्थानिक रहिवाशांचा विरोध आजही कायम राहिला. एलफिन्स्टन पुलाचे पाडकाम आणि पुनर्बांधणीच्या कामामुळे परिसरातील १९ इमारती प्रभावित होणार आहेत . या इमारतींचा पुनर्विकास केला जाईल याची लेखी हमी दिल्याशिवाय पूल पाडू देणार नाही,अशी ठाम भूमिका स्थानिक भाजपा आमदार कालिदास कोळंबकर (BJP MLA Kalidas Kolambkar) यांनी आज मांडली.
या उन्नत मार्ग प्रकल्पामुळे सुरुवातीला एलफिन्स्टन पूल परिसरातील १९ इमारती बाधित होणार होत्या. मात्र एमएमआरडीने (MMRDA)प्रकल्पाच्या आरेखनात केलेल्या फेरबदलांमुळे केवळ लक्ष्मी निवास आणि हाजी नुरानी चाळ या दोन इमारतीच बाधित होणार आहेत. या दोन इमारतींमधील मिळून ८३ रहिवाशांना त्याच परिसरातील म्हाडाच्या इमारतींमध्ये सदनिका देण्यात येणार आहेत. त्यासाठी ३०० चौरस फूटपेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या घरमालकांना ३०० चौ.फू. अधिक ३५ टक्के अतिरिक्त क्षेत्र मिळून ४०५ चौ.फु.क्षेत्रफलाची सदनिका तर ३०० ते १२९२ चौ.फु.क्षेत्रफळ असलेल्या घरमालकांना सध्याच्या क्षेत्रफळावर अतिरिक्त ३५ टक्के क्षेत्रफळ असे निकष निश्चित करण्यात आले आहेत असे म्हाडाने सांगितले.
उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister) आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Urban Development Minister Eknath Shinde)यांनी या ८३ प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन त्याच परिसरात करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. मात्र या दोन इमारतींसह परिसरातील १७ इमारतीतील स्थानिक रहिवाशांचा पुलाच्या पाडकामाला विरोध आहे. या प्रकल्पात आरेखन बदलण्यात आल्याने फक्त लक्ष्मी निवास आणि हाजी नुरानी चाळ या दोन इमारती पाडण्यात येणार असल्या तरी एकूणच या संपूर्ण प्रकल्पाच्या कामांमुळे परिसरातील १७ इमारतींना धोका निर्माण होणार आहे. पुलाचे पाडकाम आणि पुनर्बांधणीसाठी करण्यात येणाऱ्या खोदकामामुळे या इमारती खिळखिळ्या होण्याचा धोका आहे. त्यामुळे या इमारतींचा पुनर्विकास करून त्या रहिवाशांना ६२० चौरस फुटाची सदनिका देण्याचे लेखी आश्वासन सरकारने द्यावे आणि त्यानंतरच एलफिन्स्टन पुलाचे पाडकाम हाती घ्यावे,अशी भूमिका कोळंबकर यांनी मांडली.त्यामुळे गेले अनेक महिने रखडलेले एलफिन्स्टन पूल पाडण्याचे काम आणखी लांबण्याची शक्यता आहे.
हे देखील वाचा –
चार्ली कर्क हत्या: एफबीआयकडून शूटरचा फोटो जारी; संशयिताचा शोध सुरू
Women’s World Cup 2025: महिला विश्वचषकात नवा इतिहास; ICC ने घेतला ‘हा’ खास निर्णय