Home / महाराष्ट्र / Bomb Threat : दिल्ली व मुंबई हायकोर्टाला बॉम्बधमकी ! न्यायालयांचे काम ठप्प

Bomb Threat : दिल्ली व मुंबई हायकोर्टाला बॉम्बधमकी ! न्यायालयांचे काम ठप्प

Bomb Threat – देशाची राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबईतील (High Courts of Delhi and Mumbai) उच्च न्यायालयांना आज आलेल्या...

By: Team Navakal
Bomb threat

Bomb Threat – देशाची राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबईतील (High Courts of Delhi and Mumbai) उच्च न्यायालयांना आज आलेल्या बॉम्बस्फोटाच्या धमकीने संपूर्ण देशात खळबळ उडवली. देशातील न्यायव्यवस्थेच्या केंद्रबिंदूंना मिळालेल्या या धमक्या अत्यंत गंभीर असल्याने न्यायालयीन कामकाज ठप्प झाले होते. न्यायालयांचे परिसर रिकामा करण्यात आला. सुरक्षा यंत्रणांनी तातडीने शोधमोहीम राबवत तपास केला. या प्रकाराची गंभीर दखल घेत सरन्यायाधीश भूषण गवई (Chief Justice of India Bhushan Gavai)यांनी दोन्ही उच्च न्यायालयातील बॉम्ब धमकी प्रकरणाचा सविस्तर अहवाल मागवला आहे.


दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) दिलेल्या माहितीनुसार सकाळी ९ वाजताच्या सुमारास ई‑मेल प्राप्त झाला.यामध्ये मजकूर जोता की,आजच्या दिल्ली उच्च न्यायालयातील (Delhi High Court) स्फोटाने पूर्वीच्या धमक्यांवरील शंका दूर होतील. दुपारी २ वाजेपर्यंत परिसर रिकामा करावा.१९९८ च्या पाटणा बॉम्ब स्फोटांची (Patna bomb blasts) पुनरावृत्ती होणार आहे.दुपारी नमाजानंतर न्यायाधीशांच्या चेंबरमध्ये हा स्फोट होईल.त्यानंतर सर्व खंडपीठांनी सुनावण्या थांबवल्या आणि न्यायालय रिकामे केले. बॉम्ब शोध व निकामी करणारे पथक घटनास्थळी दाखल झाले .त्यांनी संपूर्ण परिसर बंदिस्त करून तपासणी केली. या तपासात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही.


त्यानंतर दुपारी मुंबई उच्च न्यायालयालाही (Mumbai High Court) बॉम्ब धमकीचा ई‑मेल मिळाला. त्यानंतर न्यायालयीन सुनावण्या थांबवून मुख्य न्यायाधीश चंद्रशेखरांसह न्यायाधीशांकडून न्यायलय परिसर रिक्त करण्यात आला. त्याचबरोबर वकील, कर्मचारी व न्यायालयीन परिसरातील लोकांना परिसरातून तात्काळ बाहेर जाण्याच्या सूचना दिल्या होत्या.मुंबई पोलिसांनी सांगितले की, न्यायालय परिसरात कोणतीही संशयास्पद वस्तू सापडलेली नाही. धमकी खोटी असल्याचे निश्चित झाले आहे. तर न्यायालयीन परिसरात प्रवेश पुन्हा सुरु केला आहे.


हे देखील वाचा –

खा.निकम सरकारी वकील कसे ? गँगस्टर विजय पालांडेचा आक्षेप

दागिन्यांसाठी अठरा कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी

 चार्ली कर्क हत्या: एफबीआयकडून शूटरचा फोटो जारी; संशयिताचा शोध सुरू

Web Title:
संबंधित बातम्या