AI Minister in Albania : सध्या प्रत्येक क्षेत्रात एआयचा वापर वाढला आहे. मात्र, थेट सरकार चालवायची जबाबदारीच एआयवर दिली तर? जगात पहिल्यांदाच अल्बेनिया (AI Minister in Albania) देशाने असा प्रयोग केला आहे.
अल्बेनियाने एआयवर (Artificial Intelligence) आधारित ‘रोबोट’ला मंत्री बनवले आहे. ‘डिएला’ (Diella) नावाचा AI मंत्री देशातील सार्वजनिक निविदांचे काम पाहणार असून, सरकारी कामांमधील भ्रष्टाचार पूर्णपणे संपवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. अल्बेनियाचे पंतप्रधान एडी रामा (Edi Rama) यांनी या नव्या ‘मंत्र्याची’ घोषणा केली.
भ्रष्टाचार संपवण्यासाठी AI ची मदत
पंतप्रधान एडी रामा लवकरच आपला चौथा कार्यकाळ सुरू करणार आहेत. त्यांनी सांगितले की, “डिएला ही मंत्रिमंडळातील पहिली सदस्य आहे, जी शारीरिकदृष्ट्या उपस्थित नाही, पण AI द्वारे व्हर्च्युअली तयार केली गेली आहे.”
ते पुढे म्हणाले की, डिएला अल्बेनियाला असा देश बनवण्यास मदत करेल, जिथे सार्वजनिक निविदा 100 टक्के भ्रष्टाचारमुक्त असतील.
Albania has become the first country in the world to have an AI minister – not an AI minister, but a virtual minister made of pixels and code and powered by artificial intelligence. Her name is "Diella", which means sunshine in Albanian, and she will be responsible for all public… pic.twitter.com/SwdjUogAGs
— Deg (@d_e_gX) September 11, 2025
अल्बेनिया हा बाल्कन देशांपैकी एक आहे, जो अंमली पदार्थ आणि शस्त्रे तस्करी करणाऱ्या टोळ्यांसाठी एक मोठे केंद्र बनला आहे. त्यामुळे देशात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याच कारणामुळे अल्बेनियाला युरोपियन युनियनमध्ये (European Union) प्रवेश मिळवण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. 2030 पर्यंत EU मध्ये प्रवेश मिळवण्याचे अल्बेनियाचे उद्दिष्ट आहे.
पूर्वी व्हर्च्युअल असिस्टंट म्हणून केले काम
डिएलाने याआधी ‘ई-अल्बेनिया’ (e-Albania) प्लॅटफॉर्मवर व्हर्च्युअल असिस्टंट म्हणून काम केले आहे. तिथे तिने नागरिकांना आणि व्यावसायिकांना सरकारी कागदपत्रे मिळवण्यासाठी मदत केली होती, ज्यामुळे अनेक कामांमधील लालफितीचा कारभार कमी झाला. पारंपारिक अल्बेनियन पोशाखात दिसणारी डिएला व्हॉइस कमांडद्वारे मदत करते आणि इलेक्ट्रॉनिक स्टॅम्पसह कागदपत्रे जारी करते.
मात्र, देशातील सर्व लोकांना ही कल्पना आवडलेली नाही. काही सोशल मीडिया युजर्सने ‘अल्बेनियात डिएलालाही भ्रष्ट केले जाईल’ अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.
हे देखील वाचा – लाखो रुपयांचा iPhone 17 आता दहा मिनिटांत तुमच्या हातात; ‘या’ कंपनीने ग्राहकांसाठी आणली खास ऑफर