Home / देश-विदेश / सुशीला कार्की ठरल्या नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान; Gen Z ने Discord वरून केली निवड; हा प्लॅटफॉर्म नक्की काय आहे?

सुशीला कार्की ठरल्या नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान; Gen Z ने Discord वरून केली निवड; हा प्लॅटफॉर्म नक्की काय आहे?

Nepal Prime Minister Sushila Karki : नेपाळच्या राजकारणात मागील आठवड्या भरात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली आहे. केपी शर्मा यांच्या राजीनाम्यानंतर...

By: Team Navakal
Nepal Prime Minister Sushila Karki

Nepal Prime Minister Sushila Karki : नेपाळच्या राजकारणात मागील आठवड्या भरात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली आहे. केपी शर्मा यांच्या राजीनाम्यानंतर आता देशाच्या माजी सरन्यायाधीश सुशीला कार्की यांनी अंतरिम सरकारमध्ये पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे.

नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान होण्याचा मान त्यांना मिळाला आहे. राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी काठमांडूमधील राष्ट्रपती भवनात आयोजित एका समारंभात त्यांना शपथ दिली. विशेष म्हणजे एखाद्या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे पंतप्रधानांची निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Gen Z च्या डिजिटल क्रांतीचा विजय

गेल्या काही दिवसांपासून नेपाळमध्ये Gen Z आंदोलकांनी मोठ्या प्रमाणावर हिंसक निदर्शने केली होती. सरकारकडून प्रमुख सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी आणि भ्रष्टाचारावरील वाढता रोष ही या आंदोलनामागची प्रमुख कारणे होती. या गंभीर स्थितीमुळे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना राजीनामा द्यावा लागला.

या आंदोलक तरुणांनी पारंपरिक राजकारण्यांवर विश्वास नसल्याने एक अनोखी वाट निवडली. ‘युथ अगेन्स्ट करप्शन’ नावाच्या एका डिस्कॉर्ड सर्व्हरवर त्यांनी नेपाळच्या पुढील नेत्याची निवड करण्यासाठी मतदान घेतले.

या सर्व्हरवर 1,30,000 पेक्षा जास्त सदस्य होते. या मतदानात सुशीला कार्की यांना 50% पेक्षा जास्त मते मिळाल्यावर 7,713 लोकांनी त्यांच्या नावाला पसंती दिली. यानंतरच त्यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला.

डिस्कॉर्ड काय आहे? (What is Discord)

मे 2015 मध्ये जेसन सिट्रॉन आणि स्टॅनिस्लाव्ह विशनेव्हस्की यांनी डिस्कॉर्डची सुरुवात केली होती. सुरुवातीला गेमर्ससाठी एक संवाद साधण्याचे व्यासपीठ म्हणून याची निर्मिती झाली होती. 2016 च्या अखेरीस या प्लॅटफॉर्मचे 25 दशलक्षाहून अधिक युजर्स झाले.

डिस्कॉर्डला आता एक संवाद प्लॅटफॉर्म म्हटले जाते, जिथे युजर्स विविध विषयांवर चर्चेसाठी एकत्र येऊ शकतात. एका डिस्कॉर्ड सर्व्हरवर 5,00,000 पर्यंत युजर्स असू शकतात, तर एका वेळी 2,50,000 युजर्स सक्रिय राहू शकतात.

यावर व्हॉइस चॅनेल, टेक्स्ट चॅनेल, स्क्रीन शेअरिंग, लाईव्ह स्ट्रीमिंग आणि चर्चा आयोजित करण्यासाठी विविध मॉडरेशन टूल्स उपलब्ध आहेत.

आंदोलकांनी या अॅपचा वापर अत्यंत प्रभावीपणे केला. त्यांनी घोषणा, तथ्य तपासणी, अपडेट्स, बातम्या आणि मदतीसाठी वेगवेगळ्या चॅनेल्सची निर्मिती केली, ज्यामुळे माहितीचा प्रवाह सहज झाला.

हे देखील वाचा – आधी आईवरून शिवी,आता एआय व्हिडिओ; काँग्रेसने सर्व मर्यादा ओलांडल्या! भाजपाची टीका

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या

Share:

More Posts