Home / News / पर्रीकर कोण? अजित पवारांचा पुण्यातील महिलेला प्रतिप्रश्न ! पुण्यात परिवार मिलन दौरा

पर्रीकर कोण? अजित पवारांचा पुण्यातील महिलेला प्रतिप्रश्न ! पुण्यात परिवार मिलन दौरा

Parrikar, who is he? Ajit Pawar’s counter question to a woman in Pune Who is Parrikar? Ajit Pawar’s Counter –...

By: Team Navakal
Who is Parrikar? Ajit Pawar’s Counter

Parrikar, who is he? Ajit Pawar’s counter question to a woman in Pune

Who is Parrikar? Ajit Pawar’s Counter – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी पुणे दौऱ्यावेळी स्थानिक महिलेला पर्रीकर कोण? असा प्रतिप्रश्न विचारला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) सरकारमध्ये संरक्षणमंत्री राहिलेल्या मनोहर पर्रीकर यांच्याबद्दल अनभिज्ञता दाखवणारा असा सवाल विचारल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पवारांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादी परिवार मिलन या उपक्रमाला सुरवात झाली. या दौऱ्यावेळी हडपसर मुंढवा भागात पाहणी करत असताना अजित पवारांना स्थानिक नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

मुंढवा आणि केशवनगरमधील रहिवाशांनी पिण्याच्या पाण्याची समस्या, रस्त्यांची दूरवस्था आणि प्रचंड वाहतूक कोंडी यांसारख्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या. एका महिलेने वाहतूक कोंडीच्या मुद्द्यावरून पर्रीकर हे वाहतूक कोंडी पाहण्यासाठी दिवसा फिरायचे, तसेच तुम्हीही कधीतरी अचानक येऊन पाहा, अशी सूचना केली. त्यावर पर्रीकर कोण, असा उलटसवाल उपमुख्यमंत्री पवार यांनी केले. यावर महिला म्हणाली, की गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर जसे अचानक फिरायचे तसेच तुम्हीही फिरून पाहा आणि न सांगता भेट द्या. आम्ही प्रश्न विचारू आणि तुम्ही उत्तर द्याल असे नको.

यावर अजित पवार यांनी म्हणाले की, मी इथे प्रश्न विचारायला आलेलो नाही. हा परिसर ठीक व्हावा आणि समस्या सुटाव्या यासाठीच मी स्वतः प्रयत्न करत आहे. यावर ती महिला म्हणाली की, येथील समस्या पाहता येथे राहायचे की नाही असा प्रश्न आम्हाला पडला आहे. यावर पवारांनी हा भाग पीएमआरडीए आणि महापालिका या वादात अडकला असल्याचं सांगत अधिकाऱ्यांना फोन करून येथील नागरिकांना सुविधा देण्यासाठी काय करता येईल यावर चर्चा केली.


हे देखील वाचा –

यावर्षी नवरात्र दहा दिवसांचे !

3 वेळा अपयश, तरीही हार मानली नाही; म्हशी राखणारी मुलगी बनली IAS अधिकारी

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या