Home / महाराष्ट्र / Devendra Fadnavis : कुणबी प्रमाणपत्र नेमके कोणाला मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले

Devendra Fadnavis : कुणबी प्रमाणपत्र नेमके कोणाला मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले

Devendra Fadnavis on Maratha Reservation GR: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून राजकारण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर...

By: Team Navakal
Devendra Fadnavis : कुणबी प्रमाणपत्र नेमके कोणाला मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले

Devendra Fadnavis on Maratha Reservation GR: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून राजकारण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 2 सप्टेंबर रोजी काढलेल्या अध्यादेशामुळे ओबीसी समाजामध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

ओबीसी नेत्यांनी या अध्यादेशामुळे ओबीसींवर अन्याय होत असल्याचा आरोप केला होता. या सर्व घडामोडींवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर भूमिका स्पष्ट करत विरोधकांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

‘सरकारचा जीआर ओबीसींवर गदा आणणारा नाही’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाजाला आश्वस्त करत म्हटले आहे की, ‘मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याबाबत सरकारने काढलेला जीआर ओबीसींच्या कोणत्याही हक्कांवर गदा आणणारा नाही. एकाही नकली व्यक्तीचा ओबीसींमध्ये समावेश होणार नाही, याची पूर्ण काळजी त्या जीआरमध्ये घेण्यात आलेली आहे.

ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहेत, त्यांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळेल. ज्यांच्याकडे नोंद नसेल, त्यांना हे प्रमाणपत्र मिळणार नाही. त्यामुळे ओबीसी समाजाने चिंता करण्याची गरज नाही.’, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

‘ओबीसींसाठी जे काही केले, ते आम्हीच’

यावेळी फडणवीसांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. ‘विरोधकांना फक्त राजकारण करता येते, पण ओबीसींसाठी जे काही महत्त्वाचे निर्णय झाले ते आमच्या सरकारने घेतले आहेत,’ असे सांगत त्यांनी आपल्या सरकारची बाजू मांडली.

फडणवीस म्हणाले, ‘2014 ते 2025 या काळात ओबीसींसाठी घेतलेले सर्व निर्णय आमच्या सरकारने घेतले. ओबीसींसाठी वेगळे मंत्रालय आणणारे आम्ही आहोत. त्यांच्यासाठी योजना तयार करणारे आम्ही, महाज्योती तयार करणारे आम्ही आणि ओबीसींना 42 वसतिगृह देणारेही आम्हीच आहोत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या सरकारने घालवलेले ओबीसींचे राजकीय आरक्षण आम्ही परत आणले.’

‘राजकारणाने समाजाचे भले होणार नाही’

राज्यात आरक्षणासाठी होत असलेल्या तरुणांच्या आत्महत्या आणि दोन्ही समाजातील वाढत चाललेल्या तेढीबद्दलही मुख्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली. ‘जोपर्यंत दोन्ही समाजाचे नेते खरी वास्तविकता समाजापर्यंत पोहोचवणार नाहीत, तोपर्यंत तेढ कमी होणार नाही. ‘ ओबीसी आरक्षण संपले आहे’, अशा प्रकारची चुकीची माहिती पसरवल्याने मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होत आहे. अशा प्रकारच्या टोकाच्या राजकारणाने कोणत्याही समाजाचे भले होऊ शकत नाही. सर्व समाजाचे हित साधणारेच सरकार काम करू शकते’, असे सांगत फडणवीसांनी सर्व नेत्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले.

हे देखील वाचा –  Nitin Gadkari: ‘माझ्या मेंदूची किंमत 200 कोटी रुपये आहे’; इथेनॉल वादावर नितीन गडकरींचे प्रत्युत्तर

Web Title:
संबंधित बातम्या

Share:

More Posts