Mukesh Ambani – रिलायन्स (Reliance) इंडस्ट्रीजचे प्रमुख उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी न्यूयॉर्कच्या ट्रायबेका परिसरातील ११ ह्युबर्ट स्ट्रीट येथील एक आलिशान इमारत तब्बल १७.४ दशलक्ष डॉलर्सना (सुमारे १५३ कोटी) खरेदी केली आहे. विशेष म्हणजे, न्यूयॉर्क (New York) मधील आपले जुने घर विकल्यानंतर जवळपास दोन वर्षांनी अंबानी यांनी ही नवी इमारत खरेदी केली आहे.
ट्रायबेका हा न्यूयॉर्कमधील सर्वात महागड्या भागांपैकी एक मानला जातो. मुंबई आणि दुबईच्या पाम जुमेरानंतर अंबानी यांनी येथे संपूर्ण इमारत विकत घेऊन पुन्हा एकदा जागतिक स्तरावर लक्ष वेधले आहे. ही मालमत्ता रिलायन्स इंडस्ट्रीजच्या अमेरिकन उपकंपनीने खरेदी केली आहे. याआधी या इमारतीचे मालकअब्जाधीश रॉबर्ट पेरा होते. त्यांनी २०१८ मध्ये ही मालमत्ता सुमारे २० दशलक्ष डॉलर्सना विकत घेतली होती आणि येथे १७,००० चौरस फूटांचे आलिशान घर बांधण्याची योजना आखली होती. अंबानींच्या कंपनीने ही इमारत तुलनेने कमी किमतीत खरेदी केली.
अंबानींनी याआधी ऑगस्ट २०२३ मध्ये मॅनहॅटनच्या वेस्ट व्हिलेजमधील दोन बेडरूमचे आलिशान अपार्टमेंट ९ दशलक्ष डॉलर्सना विकले होते. त्या अपार्टमेंटमधून हडसन नदीचे अप्रतिम दृश्य दिसत असे, असे जाणकार सांगतात.
हे देखील वाचा – वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकरचे कुटुंब पुन्हा चर्चेत; अपहरण झालेल्या व्यक्तीची थेट घरातून सुटका; नक्की काय घडले?