Home / क्रीडा / India vs Pakistan : भारत-पाक सामन्यानंतर खेळाडूंचे हस्तांदोलन नाही -नवा वाद ! पाकची तक्रार

India vs Pakistan : भारत-पाक सामन्यानंतर खेळाडूंचे हस्तांदोलन नाही -नवा वाद ! पाकची तक्रार

India vs Pakistan – दुबईमध्ये काल झालेल्या आशिया कप सामन्यात भारताने पाकिस्तानचा (India vs Pakistan) सात गडी राखून पराभव केला....

By: Team Navakal
India vs Pakistan

India vs Pakistan – दुबईमध्ये काल झालेल्या आशिया कप सामन्यात भारताने पाकिस्तानचा (India vs Pakistan) सात गडी राखून पराभव केला. या सामन्यात नाणेफेकीदरम्यान किंवा विजयानंतर भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन न केल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. यामुळे नाराज झालेला पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगा सामन्यानंतर टीव्ही मुलाखतीतही सहभागी झाला नाही. तसेच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (Pakistan Cricket Board) याबाबत आशियाई क्रिकट कौन्सिल (Asian Cricket Council) कडे अधिकृत तक्रार केली आहे.

पाकिस्तानने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, भारतीय खेळाडूंनी अखिलाडू वृत्ती दाखवली. दोन संघात तणाव निर्माण केला. पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक माइक हेसन म्हणाले की, सामन्यानंतर पाकिस्तानी संघ हस्तांदोलन करण्याची वाट पाहत होता. परंतु भारताने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आहे. नाणेफेकीच्या वेळी कर्णधार सलमानला मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांनी भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवसोबत हस्तांदोलन न करण्यास सांगितले होते. त्यामुळे आमचे संघ व्यवस्थापक नवीद अक्रम चीमा यांनी सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांच्याविरुद्धदेखील औपचारिक निषेध नोंदवला.

य सामन्यानंतर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला की, टीम इंडियाने सामन्यापूर्वी बीसीसीआय आणि भारत सरकारशी सल्लामसलत करून निर्णय घेतला होता की, आम्ही पाकिस्तानी संघाशी हस्तांदोलन करणार नाहीत. आम्ही इथे खेळण्यासाठी आलो आहोत आणि आम्ही पाकिस्तानला खेळण्यातून चो उत्तर देऊ. काही गोष्टी खेळाच्या पलीकडील असतात.


हे देखील वाचा – 

मुकेश अंबानी यांनी न्यूयॉर्कमध्ये १५३ कोटींची इमारत खरेदी केली

Web Title:
For more updates: stay tuned with Navakal
संबंधित बातम्या