Asia Cup 2025: आशिया कपच्या भारत-पाकिस्तान सामन्यात खेळाडूंनी हात न मिळवल्याने मोठा वाद झाला. भारतीय संघाने सामना जिंकल्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हात मिळवला नाही. आता अंतिम सामन्यापूर्वीच एक मोठा वाद निर्माण झाला आहे.
रिपोर्टनुसार, जर भारताने अंतिम सामना जिंकला, तर संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे (PCB) प्रमुख मोहसिन नक्वी यांच्याकडून विजेतेपदाची ट्रॉफी स्विकारणार नाही, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
हात मिळवण्यास नकार का दिला?
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भारतीय संघाने पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत हात मिळवण्यास नकार दिला. सूर्यकुमार यादवने सांगितले की, ‘आमचा हा विजय सशस्त्र दलांना समर्पित आहे. आम्ही इथे फक्त सामना खेळायला आलो होतो आणि मला वाटते की आम्ही योग्य उत्तर दिले आहे.’
दरम्यान, जर भारत आशिया कपच्या अंतिम सामन्यात पोहोचला व विजयी झाल्यास मोहसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी न स्विकारण्याची शक्यता आहे.नक्वी हे आशिया क्रिकेट कॉन्सिलचे अध्यक्ष देखील आहेत. त्यामुळे आशिया कप जिंकणाऱ्या संघाच्या कर्णधाराला त्यांच्या हस्ते ट्रॉफी प्रदान केली जाईल. मात्र, भारताने ही स्पर्धा जिंकल्यास नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्विकारणार नाही, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची तक्रार
दरम्यान, भारतीय संघाच्या या भूमिकेमुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड नाराज झाले असून, त्यांनी एशियन क्रिकेट कौन्सिल (ACC) आणि इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल (ICC) कडे अधिकृत तक्रार केली आहे. पीसीबीने मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांना या घटनेसाठी जबाबदार धरून त्यांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे.
बीसीसीआयची भूमिका
बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले की, भारतीय संघाने हा निर्णय वरिष्ठ खेळाडू आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यासोबत विचारपूर्वक घेतला आहे. गौतम गंभीर यांनी यापूर्वीच म्हटले होते की, ‘जोपर्यंत भारतीय भूमीवर दहशतवादी कारवाया सुरू राहतील, तोपर्यंत पाकिस्तानसोबत कोणतेही खेळाडू संबंध ठेवले जाणार नाहीत.’
हे देखील वाचा – अमेरिकेत TikTok वरची बंदी टळणार; ट्रम्प यांचा चीनसोबत महत्त्वाचा करार; भारतात काय होणार?