Home / महाराष्ट्र / Advocate Shinde : सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांचे निधन

Advocate Shinde : सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांचे निधन

Advocate Shinde – सर्वोच्च न्यायालयातील (Supreme Court)वकील सिद्धार्थ शिंदे (४८) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने (cardiac arrest) निधन झाले. न्यायालयीन कामकाज सुरू...

By: Team Navakal

Advocate Shinde – सर्वोच्च न्यायालयातील (Supreme Court)वकील सिद्धार्थ शिंदे (४८) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने (cardiac arrest) निधन झाले. न्यायालयीन कामकाज सुरू असताना त्यांना अचानक चक्कर आल्याने दिल्लीतील एम्स रुग्णालयात (AIIMS Hospital ) दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पार्थिव आज सकाळी नवी दिल्लीहून पुण्यात आणण्यात आले. त्यानंतर दुपारी रविवार पेठेतील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सिद्धार्थ शिंदे (Siddharth Shinde) हे माजी केंद्रीय कृषिमंत्री अण्णासाहेब शिंदे (Union Agriculture Minister Annasaheb Shinde)यांचे नातू होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. मूळचे श्रीरामपूर येथील असलेले शिंदे कुटुंबीय अनेक वर्षांपासून पुण्यात स्थायिक आहेत.

न्यायालयीन क्षेत्रात तसेच सामाजिक वर्तुळात शिंदे यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. ते केवळ एक प्रभावी वकील नव्हते, तर सर्वसामान्यांना गुंतागुंतीचे कायदे सोप्या भाषेत समजावून सांगणारे मार्गदर्शक म्हणूनही त्यांची ख्याती होती. मराठा आरक्षण तसेच राज्यातील सत्तासंघर्षाशी संबंधित सुनावण्यांमध्ये त्यांनी अचूक युक्तिवाद व माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्या निधनाने विधी आणि सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.


हे देखील वाचा –

साताऱ्यात चमत्कार! एकाच वेळी 4 अपत्यांना जन्म, महिला 7 मुलांची आई

‘दशावतार’चा बॉक्स ऑफिसवर धमाका, आता अवघ्या 99 रुपयात पाहा चित्रपट; प्रेक्षकांसाठी खास ऑफर

रेल्वे तिकीट बुक करताय? IRCTC च्या नियमांमध्ये मोठा बदल; जाणून घ्या

Web Title:
संबंधित बातम्या