Advocate General Birendra Saraf Resigns for Personal Reasons
AG Birendra Saraf Resigns – राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ (AG Birendra Saraf )यांनी वैयक्तिक कारणास्तव आपल्या पदाचा आज राजीनामा (Resigns )दिला. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis)यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्र सरकारची उच्च आणि सर्वोच्च न्यायालयांमध्ये (High Court and Supreme Court)बाजू मांडण्याची आणि महाराष्ट्र सरकारला कायदेशीर सल्ला देण्याची मुख्य जबाबदारी महाधिवक्ता म्हणून सराफ यांच्यावर होती. त्यांनी अचानक राजीनामा दिल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.
सराफ यांनी 22 ऑगस्ट रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राजीनामा सादर केला. आपल्याला खासगी जीवनात आणि वकिलीत परतायचे असल्याने राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांनी सराफ यांना डिसेंबर 2025 पर्यंत पदावर राहण्याची विनंती केली. तोपर्यंत राज्य सरकार त्यांच्या जागी दुसरा वकील शोधणार आहे. त्यामुळे सराफ आता डिसेंबर महिन्यापर्यंत काम पाहणार आहेत.
सराफ हे 2022 पासून महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता म्हणून कार्यरत आहेत. त्यांची नियुक्ती तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने केली होती. 2024 च्या निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांची नियुक्ती कायम ठेवण्यात आली. 28 वर्षांचा वकिलीचा अनुभव असलेल्या सराफ यांनी महाधिवक्ता म्हणून त्यांनी राज्य सरकारच्या वतीने मराठा आरक्षण, गणेशोत्सवातील पीओपी मूर्ती विसर्जन धोरण, बदलापूर अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण यासारख्या अनेक प्रकरणांत बाजू मांडली होती.
हे देखील वाचा –
31 जानेवारीपर्यंत सर्व निवडणुका पूर्ण करा ! निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाने खडसावले
ऑपरेशन सिंदूर’नंतर भारताने नाकरली होती अमेरिकेची मध्यस्थी, पाकच्या मंत्र्यानेच केला खुलासा
ओबीसी समाजाला २५ वर्षात केवळ २,५०० कोटी दिले !छगन भुजबळांची खंत