Home / महाराष्ट्र / MNS Vs BJP : मुंबईचा महापौर मराठीच ; मनसेचे भाजपाला प्रत्युत्तर

MNS Vs BJP : मुंबईचा महापौर मराठीच ; मनसेचे भाजपाला प्रत्युत्तर

MNS Vs BJP – भाजपाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम (Mumbai BJP president Amit Satam) यांनी ठाकरेंकडे मुंबईची सत्ता गेली तर...

By: Team Navakal

MNS Vs BJP – भाजपाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम (Mumbai BJP president Amit Satam) यांनी ठाकरेंकडे मुंबईची सत्ता गेली तर महापौर खान (Khan) असेल असा टोला भाजपा मेळाव्यात लगवला होता. यावर आज मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande )यांनी मुंबईचा महापौर मराठीच होणार, असे प्रत्युत्तर दिले आहे.

संदीप देशपांडे पोस्ट करत म्हणाले की, मुंबईचा महापौर हा मराठीच होणार आहे. खानाची भीती दाखवून भैय्या (Bhaiyya) आणि गुज्जु (Gujju)महापौर करण्याचा कट आम्ही उधळून लावणार. पतपेढीच्या विजयामुळे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्यांची कावीळ महापालिका निवडणुकीत (municipal elections) उतरणार.

यावर भाजपा माध्यम प्रमुख नवनाथ बन (BJP media chief Navnath Ban)म्हणाले की, मुंबईचा महापौर मराठीच होणार हे आम्हाला कुणाकडून शिकायची गरज नाही. मराठी माणसाच्या हक्कासाठी भाजपाने नेहमीच लढा दिला आहे, हे मुंबईतील मराठी माणसाला ठाऊक आहे. आज मुंबईकर आत्मविश्वासाने उभा आहे. त्याला भीती दाखवायची गरज नाही, तर साथ द्यायची गरज आहे. महापालिका निवडणुकीत मराठी मतदार तुमच्या भावनिक अजेंड्याला बळी पडणार नाहीत.


हे देखील वाचा – 

तुम्ही स्वतः जाऊन देवाला काहीतरी करण्यासाठी सांगा’; सरन्यायाधीश गवईंच्या वक्तव्यामुळे मोठा वाद

Tesla Cybertruck क्रॅश टेस्टमध्ये पास, पण एका चुकीमुळे सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; पाहा व्हिडिओ

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण ; सुटलेल्या ७ जणांना नोटीस

Web Title:
संबंधित बातम्या