Home / राजकीय / Meenatai statue desecration : मीनाताईंच्या पुतळ्याची विटंबना प्रकरणी आरोपीला 20 सप्टेंबरपर्यंत कोठडी

Meenatai statue desecration : मीनाताईंच्या पुतळ्याची विटंबना प्रकरणी आरोपीला 20 सप्टेंबरपर्यंत कोठडी

Meenatai statue desecration : मुंबईत दादर येथील शिवाजी पार्क परिसरातील स्व. मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याच्या विटंबना (Meenatai statue desecration) प्रकरणी...

By: Team Navakal
Meenatai statue desecration

Meenatai statue desecration : मुंबईत दादर येथील शिवाजी पार्क परिसरातील स्व. मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याच्या विटंबना (Meenatai statue desecration) प्रकरणी अटक केलेल्या उपेंद्र पावसकर याला शिवडी न्यायालयाने शनिवार २० सप्टेंबरपर्यंत पोलीस (Police) कोठडी सुनावली आहे. पावसकर हा उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) कार्यकर्त्याचा चुलतभाऊ असून कौटुंबिक संपत्तीच्या वादात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्याकडून हस्तक्षेप होत असल्याने त्याने हे कृत्य केल्याचे आपल्या कबुलीजबाबात सांगितले आहे.

मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्कमध्ये स्व. मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर काल सकाळी अज्ञात व्यक्तीने लाल ऑईल पेंट फेकून विटंबना केली. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण होऊन संतप्त शिवसैनिकांनी या परिसरात गर्दी केली होती. त्यानंतर कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी पुतळ्याच्या ठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी घटनास्थळी भेट देऊन २४ तासांत आरोपी पकडण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर पोलिसांनी रात्री उपेंद्र पावसकर याला अटक केली.

यावेळी त्याने तो उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्याचा चुलतभाऊ असल्याची माहिती दिली. कबुलीजबाबात संपत्तीच्या वादात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याकडून हस्तक्षेप होत असल्याचा आरोप त्याने केला. पोलिसांनी आज त्याला शिवडी न्यायालयात हजर होते. यावेळी पोलिसांनी न्यायालयात सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपीची ओळख पटवण्यात आल्याचे सांगितले. त्याने हे कृत्य का केले, याची चौकशी करण्यासाठी पोलीस कोठडीची द्यावी, अशी मागणी पोलिसांनी केली. त्यानंतर न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

आरोपीकडे स्वतःचा वकील नसल्यामुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणा (डीएलएसए) द्वारे वकील सुमेधा कोकाटे यांनी त्याचे प्रतिनिधित्व केले. त्या म्हणाल्या की, पोलिसांचे म्हणणे आहे की, त्यांच्याकडे काही सीसीटीव्ही फुटेज आहे. त्यावरून आरोपीची ओळख निश्चित केली. मात्र, रिमांडची कॉपी वाचली असता असे दिसते की, प्रकरणात अद्याप कोणतेही प्रत्यक्ष साक्षीदार नोंदलेले नाहीत आणि गुन्हा अज्ञाताविरुद्ध नोंदवण्यात आला आहे.

दरम्यान, रंगफेकीच्या घटनेनंतर मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याभोवती ताडपत्री लावण्यात आली आहे. आता मीनाताईंच्या पुतळ्याचे सुशोभीकरण उबाठाकडून करण्यात येणार आहे. इथे सीसीटीव्ही बसवण्यासोबतच पुतळ्याचे सुशोभीकरणही केले जाणार आहे. स्व. मीनाताई ठाकरे स्मृती स्मारक समितीच्या वतीने पालिकेला तसे पत्र देण्यात येणार असून, सुशोभीकरणासाठी आवश्यक परवानगी घेतली जाणार आहे. पुतळ्याच्या वर असलेली शेड जीर्ण झाल्यामुळे, तिची दुरुस्ती करण्यात येणार आहे. याशिवाय पुतळ्याची डागडुजीही करण्यात येणार आहे.


हे देखील वाचा – 

तुम्ही स्वतः जाऊन देवाला काहीतरी करण्यासाठी सांगा’; सरन्यायाधीश गवईंच्या वक्तव्यामुळे मोठा वाद

मुंबईचा महापौर मराठीच ; मनसेचे भाजपाला प्रत्युत्तर

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण ; सुटलेल्या ७ जणांना नोटीस

Web Title:
संबंधित बातम्या