Manoj Jarange – मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह व्हिडिओ (objectionable video)तयार करून तो व्हायरल करण्यात आला. या घटनेनंतर काल रात्री जरांगे पाटील यांचे समर्थक वसमत तालुक्यातील भेंडेगाव (Bhendegaon)येथे संबंधित व्यक्तींना जाब विचारण्यासाठी गेले असता दोन गटांमध्ये बाचाबाची झाली.
या वाद वाढून गाड्यांची तोडफोड करण्यात आली. भेंडेगावात काही काळ तणाव निर्माण झाला. घटनेची माहिती मिळताच कुरुंदा पोलिसांनी (Kurunda police) तातडीने धाव घेत जमावाला पांगवले व गावात शांतता प्रस्थापित केली.
त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करत मोठ्या संख्येने समर्थकांनी कुरुंदा पोलीस ठाण्यात गर्दी केली. हिंगोलीचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे (Shrikrishna Kokate)यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
कुरुंदा पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, दोन समाजात तेढ निर्माण करण्याबाबत आलेल्या तक्रारीवर कारवाई सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक रामदास निरदोडे (Ramdas Niradode)यांनी दिली.
हे देखील वाचा –
लाडकी बहीण योजनेत मोठा बदल; 2 महिन्यात करा ‘हे’ काम; अन्यथा पैसे बंद
महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये मतदार यादीत घोटाळा संगणकाच्या मदतीने फेरफार! राहुल गांधींनी पुरावे दिले