India vs Pakistan Asia Cup 2025: आशिया कपमध्ये आज पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान आमने सामने येणार आहे. याआधीच्या ग्रुप स्टेजमधील सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता.
त्यानंतर आता हे दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी संघ ‘सुपर 4’ फेरीत पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. आज (21 सप्टेंबर)दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये हा रोमांचक सामना होणार आहे.
दोन्ही संघांनी कशी मिळवली ‘सुपर 4’ मध्ये जागा?
स्पर्धेच्या गट ‘अ’ (Group A) मध्ये असलेल्या भारताने आपला पहिला सामना UAE विरुद्ध 9 विकेट्सने जिंकला, तर त्यानंतर पाकिस्तानला 7 विकेट्सने हरवून ‘सुपर 4’ मध्ये आपले स्थान निश्चित केले. UAE ने ओमानला हरवल्यामुळे भारताचे ‘सुपर 4’ मधील स्थान पक्के झाले.
दुसरीकडे, पाकिस्तानने UAE विरुद्ध 41 धावांनी विजय मिळवून ‘सुपर 4’ मध्ये प्रवेश केला. गट ‘ब’ (Group B) मधून श्रीलंका आणि बांगलादेश हे संघ पात्र ठरले आहेत. श्रीलंकेने आपले सर्व 3 सामने जिंकून पात्रता मिळवली, तर बांगलादेशने श्रीलंकेविरुद्धचा सामना गमावल्यानंतरही अखेरची जागा मिळवली.
India vs Pakistan Asia Cup 2025: सामना कधी आणि कुठे पाहणार?
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप 2025 चा हा सामना 21 सप्टेंबररोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार रात्री 8:00 वाजता सुरू होईल.
टॉस 7:30 वाजता होईल. तुम्ही सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या Sony Sports 1, 3 (Hindi), 4 (Telugu), 4 (Tamil), आणि 5 या चॅनेलवर थेट प्रक्षेपण पाहू शकता. तसेच, सोनी लिव्ह (SonyLIV) ॲप आणि वेबसाइटवर सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंगही उपलब्ध असेल.
Asia Cup 2025: ‘सुपर 4’ फेरीचे संपूर्ण वेळापत्रक
सामने | तारीख | ठिकाण | वेळ (IST) |
श्रीलंका vs बांगलादेश | 20 सप्टेंबर | दुबई | रात्री 8:00 |
भारत (A1) vs पाकिस्तान (A2) | 21 सप्टेंबर | दुबई | रात्री 8:00 |
पाकिस्तान vs श्रीलंका | 23 सप्टेंबर | अबू धाबी | रात्री 8:00 |
भारत vs बांगलादेश | 24 सप्टेंबर | दुबई | रात्री 8:00 |
पाकिस्तान vs बांगलादेश | 25 सप्टेंबर | दुबई | रात्री 8:00 |
भारत vs श्रीलंका | 26 सप्टेंबर | दुबई | रात्री 8:00 |
हे देखील वाचा – लवकरच धावणार मुंबईची पहिली पूर्ण भूमिगत मेट्रो; तिकिट किंमत ते प्रवासाची वेळ; जाणून घ्या सर्व माहिती