iPhone 17 India sales: नुकत्याच लाँच झालेल्या iPhone 17 सिरीजच्या विक्रीसाठी भारतात ग्राहकांची मोठी गर्दी आणि लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळाले. लाखो रुपये खर्चून आयफोन खरेदी करण्यासाठी ग्राहकांना पहिल्याच दिवशी प्रचंड गर्दी केल्याचे दिसून आले.
पण या गर्दीपेक्षाही फोन खरेदी करण्याच्या पद्धतीबाबत समोर आलेली आकडेवारी खरी धक्कादायक आहे.
आकडेवारी काय सांगते?
भारतात iPhone ची क्रेझ खूप जास्त आहे आणि याला आकडेवारीचाही आधार आहे. देशातील सर्वात लोकप्रिय रिटेल स्टोअरपैकी एक असलेल्या क्रोमाने (Croma) जानेवारी ते ऑगस्ट 2025 या काळात iPhone खरेदी करणाऱ्या ग्राहकांची आकडेवारी दिली आहे.
या आकडेवारीनुसार, 25 टक्के ग्राहकांनी क्रेडिट कार्ड, EMI आणि NBFC कर्जावर iPhone खरेदी केला आहे. ‘नो-कॉस्ट EMI’ सारख्या पर्यायांमुळे आता दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीतील शहरांमधील ग्राहकांनाही iPhone घेणे सोपे झाले आहे.
भारतीय EMI वर iPhone का खरेदी करतात?
समाजातील उच्चभ्रू लोकांप्रमाणे दिसण्यासाठी अनेकजण iPhone खरेदी करतात. काही वर्षांपूर्वी iPhone फक्त सेलिब्रिटी किंवा खूप श्रीमंत लोकांसाठी होता. त्यामुळे सर्वसामान्यांना तो एक ‘स्टेटस सिम्बॉल’ वाटू लागला. EMI चा पर्याय उपलब्ध झाल्यानंतर प्रत्येकालाच हा ‘स्टेटस सिम्बॉल’ मिळवण्याची संधी मिळाली. यामुळेच आजही भारतात आयफोनला लक्झरी वस्तू मानले जाते.
भारतात ॲपलच्या वाढत्या बाजारपेठेमुळे भविष्यात EMI वर iPhone खरेदी करणाऱ्यांची संख्या निश्चितच वाढणार आहे.
हे देखील वाचा – विजेविना जीवन जगणाऱ्या डॉ. हेमा साने यांचे निधन; निसर्गाची ‘एनसायक्लोपिडिया’ म्हणून ओळख