Home / लेख / Amazon Sale: Samsung च्या ‘या’ स्मार्टफोनवर बंपर डिस्काउंट; हजारो रुपयांची होईल बचत

Amazon Sale: Samsung च्या ‘या’ स्मार्टफोनवर बंपर डिस्काउंट; हजारो रुपयांची होईल बचत

Samsung Galaxy A55 5G: अमेझॉन इंडियाचा ‘ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल’ (Amazon Great Indian Festival Sale) 23 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे,...

By: Team Navakal
Samsung Galaxy A55 5G

Samsung Galaxy A55 5G: अमेझॉन इंडियाचा ‘ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल’ (Amazon Great Indian Festival Sale) 23 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे, पण त्याआधीच अमेझॉनने ‘अर्ली डील्स’ लाईव्ह केल्या आहेत.

या सेलमध्ये अनेक डिव्हाईसेसवर दमदार ऑफर्स दिल्या जात आहेत. यात Samsung आणि Realme चे फोन त्यांच्या लाँच किंमतीपेक्षा 16,000 रुपयांपर्यंत स्वस्तात मिळत आहेत. चला जाणून घेऊया या ऑफर्सबद्दल सविस्तर.

Realme GT 7 Pro वर डिस्काउंट

Realme च्या या फोनच्या 12GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज व्हेरियंटची किंमत अमेझॉनवर 50,998 रुपये आहे. अर्ली डील्समध्ये या फोनवर 6,000 रुपयांचा कूपन डिस्काउंट दिला जात आहे. यासोबतच 2,549 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळू शकतो. एक्सचेंज ऑफरमध्ये तुम्ही या फोनची किंमत 42,600 रुपयांपर्यंत कमी करू शकता.

या फोनमध्ये 6.78 इंचाचा डिस्प्ले आहे, जो 120Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. यात Snapdragon 8 Elite चिपसेट प्रोसेसर आहे. फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि 58,000mAh ची बॅटरी आहे, जी 120W च्या फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Samsung Galaxy A55 5G वर मोठी सूट

Samsung च्या या फोनवर मोठी डील मिळत आहे. लाँचच्या वेळी याच्या 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज असलेल्या व्हेरियंटची किंमत 39,999 रुपये होती. हा फोन अमेझॉनवर आता फक्त 23,999 रुपयांना उपलब्ध आहे. यावर 1,199 रुपयांपर्यंतचा कॅशबॅकही दिला जात आहे. एक्सचेंज ऑफरमध्ये तुम्ही या फोनची किंमत 22,700 रुपयांपर्यंत कमी करू शकता.

या फोनमध्ये 6.6 इंचाचा एचडी+ डिस्प्ले आहे, जो 120Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोनमध्ये Exynos 1480 प्रोसेसर आहे आणि 5,000mAh ची बॅटरी आहे. फोटोग्राफीसाठी 50 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि सेल्फीसाठी 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

हे देखील वाचा – ऑस्कर 2026 साठी भारताची अधिकृत एंट्री जाहीर; नीरज घायवानच्या ‘Homebound’ चित्रपटाची निवड

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या