Rahul Gandhi – लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतचोरीवरून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांच्यावर हल्ला केला. ते म्हणाले की, माझ्याकडे मते चोरीचे पुरावे असून ते जाहीर करेन. त्यानंतर मोदींनी मतेचोरी करून सत्ता मिळवली, नाही, याबाबत कोणीही शंका घेणार नाही, आमच्याकडे १०० टक्के पुरावे आहेत. लवकरच आम्ही हायड्रोजन बॉम्ब (hydrogen bomb)फोडू, जो संपूर्ण सत्य देशासमोर आणेल. आम्ही कधीही पुराव्याशिवाय काहीही बोलत नाही. आमच्याकडे पूर्ण पुरावे आहेत.
आज राहुल गांधी केरळमधील वायनाड (Wayanad) या आपल्या मतदारसंघात आले होते. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, मागील पत्रकार परिषदेत काँग्रेसने मतदार यादीतील घोटाळ्याची उदाहरणे देखील दिली होती. महादेवपुरा (Mahadevapura) आणि आळंदमध्ये (Aland)चुकीच्या पद्धतीने मते जोडण्याच्या आणि वगळण्याचे आम्ही पुराव्यानिशी दाखवले. मुख्य निवडणूक आयुक्त (Chief Election Commissioner) ज्ञानेश कुमार मत चोरांना संरक्षण देत आहेत. आळंद विधानसभा मतदारसंघातील ६ हजार मतदारांची नावे वगळण्याच्या प्रकरणाची सीआयडी चौकशी सुरू आहे. ही चौकशी मुख्य निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करते. मी देशासमोर सत्य आणेन.
हायड्रोजन बॉम्ब पंतप्रधान मोदींच्या संसदीय मतदारसंघ वाराणशीशी संबंधित आहे का, असे विचारले असता राहुल म्हणाले की अंदाज लावणे हे माध्यमांचे काम आहे. माझे काम देशासमोर सत्य आणणे आहे.
भारताचे पंतप्रधान कुमकुवत
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एच-वन बी व्हिसासाठी वार्षिक शुल्क एक लाख डॉलर्सने (अंदाजे ८८ लाख रुपये) वाढवले आहे. या सा शुल्क वाढीचा सर्वात मोठा फटका भारतीयांना बसणार आहे. यावरून राहुल गांधी यांनी सोशल मीडिया एक्सवर पोस्ट करत म्हटले की, “मी पुन्हा सांगतो, भारताचे पंतप्रधान कमकुवत आहेत.
I repeat, India has a weak PM. https://t.co/N0EuIxQ1XG pic.twitter.com/AEu6QzPfYH
— Rahul Gandhi (@RahulGandhi) September 20, 2025
हे देखील वाचा –
लवकरच धावणार मुंबईची पहिली पूर्ण भूमिगत मेट्रो; तिकिट किंमत ते प्रवासाची वेळ; जाणून घ्या सर्व माहिती
iPhone 17 खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; EMI वरील खरेदी करणाऱ्यांचा आकडा पाहून व्हाल हैराण
विजेविना जीवन जगणाऱ्या डॉ. हेमा साने यांचे निधन; निसर्गाची ‘एनसायक्लोपिडिया’ म्हणून ओळख