Home / मनोरंजन / Poonam Pandey :पूनम पांडे मंदोदरीची भूमिका करणार;अयोध्येतील साधू-संतांचा विरोध

Poonam Pandey :पूनम पांडे मंदोदरीची भूमिका करणार;अयोध्येतील साधू-संतांचा विरोध

Poonam Pandey – दिल्लीतील लवकुश रामलीलामध्ये (Lav Kush Ramleela)रावणाची पत्नी मंदोदरीची (Mandodari) पत्नी भूमिका मॉडेल पूनम पांडे साकारणार असल्याची घोषणा...

By: Team Navakal
Poonam Pandey

Poonam Pandey – दिल्लीतील लवकुश रामलीलामध्ये (Lav Kush Ramleela)रावणाची पत्नी मंदोदरीची (Mandodari) पत्नी भूमिका मॉडेल पूनम पांडे साकारणार असल्याची घोषणा होताच वाद निर्माण झाला आहे. २१ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या रामलीलामध्ये पूनम पांडेच्या निवडीमुळे अयोध्येतील साधू-संतांमध्ये ( Religious leaders)नाराजी पसरली आहे.

पूनम पांडे तिचे व्हिडिओ, विचित्र दावे यामुळे वारंवार चर्चेत राहते. अलीकडेच ती स्वतःच्या मृत्यूची खोटी बातमी पसरवण्याच्या प्रकरणामुळेही चर्चेत होती.

विश्व हिंदू परिषदेने (The Vishwa Hindu Parishad)रामलीला समितीला पत्र लिहून पूनम पांडेला भूमिका देण्याबाबत पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे. संघटनेचे म्हणणे आहे की, रामलीला हा फक्त नाट्यप्रयोग नाही तर भारतीय मूल्ये आणि परंपरांचे जिवंत मूर्त रूप आहे. मंदोदरी ही सद्गुण, प्रतिष्ठा, संयम आणि समर्पक पत्नीचे आदर्श प्रतिक आहे आणि तिच्या भूमिकेसाठी ही मूल्ये प्रतिबिंबित करणाऱ्या अभिनेत्रीची निवड होणे आवश्यक आहे. कोणत्याही कलाकाराचा वैयक्तिक विरोध हा उद्देश नाही, तर रामायणावर आधारित नाटकाची सांस्कृतिक पवित्रता आणि भक्तांच्या श्रद्धेचे रक्षण हा मुख्य हेतू आहे.


हे देखील वाचा – 

मंत्र्यांनो जमत नसेल तर खुर्च्या खाली करा! अजित पवारांचा दम

लवकरच हायड्रोजन बॉम्ब फोडून ; मोदींची मतचोरी उघड करणार ! राहुल गांधींचा पुन्हा इशारा

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकरच सुरू; कोडपासून ते कनेक्टिव्हिटीपर्यंत जाणून घ्या महत्त्वाची माहिती

Web Title:
संबंधित बातम्या