Induri Chaat and barch kahi – मनसेचे (MNS) मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी काही महिन्यांपूर्वी दादरमध्ये इंदुरी चाट आणि बरंच काही ( Induri Chaat and barch kahi) या नावाने उपहारगृह सुरू केले आहे. प्रसिद्ध शेफ शिप्रा खन्ना ( Shipra Khanna) आणि रश्मी उदयसिंह (Rashmi Uday Singh) यांनी या उपहारगृहाला भेट दिली होती, त्याचा व्हिडिओ देशपांडे यांनी सोशल मीडियावर शेअर केला. मात्र या व्हिडिओवरून भाजपा (BJP) कार्यकर्त्यांनी संदीप देशपांडे यांच्या उपहारगृहातील पदार्थ आणि तिथे काम करणारे कूक व कर्मचारी परप्रांतीय असल्याचा दावा करत टीका केली आहे.
त्यांनी म्हटले की, देशपांडे स्वतःच्या हॉटेलमध्ये मराठी आचारीही ठेवू शकत नाहीत, पण मराठी महापौर बनवण्याच्या गप्पा मात्र मारत आहेत. या हॉटेलचा कूक (आचारी) परप्रांतीय, या हॉटेलमधील पदार्थ परप्रांतीय, प्रमोशन करत आहेत तेही परप्रांतीय. फक्त नाव देवनागरी लिपीत लिहिले आहे. पण त्यांना स्वतःच्या हॉटेलमध्ये मराठी आचारी ठेवता येत नाही, ते मराठी महापौर करण्याच्या गप्पा मारत आहेत. महापौर मराठीच होणार. पण महायुतीच्या हिंदुत्ववादी विचारांचा होणार.
दरम्यान, काहींनी राज ठाकरे (Raj Thackeray) आणि संदीप देशपांडे यांचा फोटो सोशल मीडियावर शेअर करून उपरोधिक कमेंट केल्या आहेत. एका पोस्टमध्ये लिहिले आहे की, हमारे संदीप भय्या के दुकान में आने का हा! या टीकेला प्रत्युत्तर देताना संदीप देशपांडे म्हणाले की, इंदुरी चाटवरून मला ट्रोल करणाऱ्यांना इतिहास माहीत नाही. मराठे इंदूर भागात गेले, तिथे स्थानिक पदार्थांवर आपला प्रभाव टाकला. तेच पदार्थ पुढे इंदुरी फूड म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यामुळे त्यांच्या बुद्धीची ही दिवाळखोरी आहे.
हे देखील वाचा –
कर्नाटकमध्ये सोमवारपासून जातनिहाय जनगणना सुरु
पूनम पांडे मंदोदरीची भूमिका करणार;अयोध्येतील साधू-संतांचा विरोध