Home / महाराष्ट्र / Onion farmers protest : कवडीमोल भाव ! कांदा सडू लागला संतप्त शेतक-यांचा रास्ता रोको

Onion farmers protest : कवडीमोल भाव ! कांदा सडू लागला संतप्त शेतक-यांचा रास्ता रोको

Onion farmers protest : गेले काही दिवस नाशिक (Nashik) जिल्ह्यातील कांदा उत्पादन पट्ट्यात शेतकऱ्यांचे सतत आंदोलन सुरू आहे. धुळे, चांदवड...

By: Team Navakal
Onion farmers protest

Onion farmers protest : गेले काही दिवस नाशिक (Nashik) जिल्ह्यातील कांदा उत्पादन पट्ट्यात शेतकऱ्यांचे सतत आंदोलन सुरू आहे. धुळे, चांदवड , मालेगाव, लासलगाव येथे आंदोलने झाल्यानंतर आज येवल्याच्या एरंडगावचे कांदा उत्पादक शेतकरी (Onion farmers protest) आपल्या मागण्यासाठी रस्त्यावर उतरले . मालेगाव सूरत रस्त्यावरही शेतकऱ्यांनी कांदा फेकून आंदोलन केले.

प्रहार संघटनेच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन करीत या शेतकऱ्यांनी सकाळी नाशिक ने छत्रपती संभाजीनगर जाणाऱ्या महामार्गावर रास्ता रोको केला. या आंदोलनावेळी शेतकरी म्हणाले की केंद्राच्या हस्तक्षेपामुळे कांद्याचा भाव पडला आहे. आता कांदा प्रति क्विंटल केवळ ७०० ते ८०० रुपये दराने खरेदी केला जात आहे. यात आमचा वाहतूक खर्चही निघत नाही. काहींनी चांगला भाव नंतर मिळेल या आशेने कांदा साठवला होता तोही सडू लागला आहे. कांद्याला ३ हजार रुपये क्विंटल भाव मिळावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.


हे देखील वाचा – 

कर्नाटकमध्ये सोमवारपासून जातनिहाय जनगणना सुरु

देशपांडेंच्या उपहारगृहात मराठी आचारीच नाही ! – भाजपाची टीका

माज दाखवू नका! रोहित पवार संतापले

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या