Dadasaheb Phalke Award: मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांना 2023 साठीचा ‘दादासाहेब फाळके’ पुरस्कार जाहीर झाला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च मानला जाणारा हा पुरस्कार त्यांना 23 सप्टेंबर, 2025 रोजी होणाऱ्या 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात प्रदान केला जाईल.
PM मोदींकडून कौतुक
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ‘X’ (Twitter) वर एक पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली.
“मोहनलाल यांचा उल्लेखनीय प्रवास पिढ्यानपिढ्यांना प्रेरणा देतो. दिग्गज अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते म्हणून भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी त्यांचा सन्मान केला जात आहे,” असे मंत्रालयाने म्हटले आहे.
Shri Mohanlal Ji epitomises excellence and versatility. With a rich body of work spanning decades, he stands as a leading light of Malayalam cinema, theatre and is deeply passionate about the culture of Kerala. He has also delivered remarkable performances in Telugu, Tamil,… https://t.co/4MWI1oFJsJ pic.twitter.com/P0DkKg1FWL
— Narendra Modi (@narendramodi) September 20, 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्वीट करून मोहनलाल यांचे अभिनंदन केले. “मोहनलाल हे उत्कृष्ट आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे प्रतीक आहेत. अनेक दशकांच्या समृद्ध कारकिर्दीमुळे ते मल्याळम सिनेमा आणि थिएटरमधील एक अग्रगण्य व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. त्यांनी तेलुगू, तमिळ, कन्नड आणि हिंदी चित्रपटांमध्येही उत्कृष्ट कामगिरी केली आहे” असे मोदी म्हणाले.
‘द कम्प्लिट ॲक्टर’ चा सर्वोच्च सन्मान
चार दशकांपेक्षा जास्त काळ चाललेल्या त्यांच्या कारकिर्दीत मोहनलाल यांनी 400 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल त्यांना 2001 मध्ये पद्मश्री आणि 2019 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
गेल्या वर्षी 2022 सालचा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार (Dadasaheb Phalke Lifetime Achievement Award) अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांना मिळाला होता.
हे देखील वाचा – Tesla Cybertruck क्रॅश टेस्टमध्ये पास, पण एका चुकीमुळे सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; पाहा व्हिडिओ