Home / देश-विदेश / अमूलने ग्राहकांना दिला GST चा फायदा; 700 हून अधिक पदार्थ स्वस्त

अमूलने ग्राहकांना दिला GST चा फायदा; 700 हून अधिक पदार्थ स्वस्त

Amul Price Cut: प्रसिद्ध दूध आणि खाद्यपदार्थ ब्रँड अमूलने नुकत्याच झालेल्या वस्तू आणि सेवा कर (GST) सुधारणांचा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी...

By: Team Navakal
Amul Price Cut

Amul Price Cut: प्रसिद्ध दूध आणि खाद्यपदार्थ ब्रँड अमूलने नुकत्याच झालेल्या वस्तू आणि सेवा कर (GST) सुधारणांचा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे.

अमूलने तूप (Ghee), बटर (Butter), आईस्क्रीम (Ice Cream) आणि स्नॅक्ससह 700 हून अधिक उत्पादनांच्या किमती कमी केल्या असून, नवे दर 22 सप्टेंबरपासून देशभरात लागू होतील.

कोणती उत्पादने स्वस्त झाली?

अमूलची मूळ कंपनी गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने (GCMMF) जाहीर केलेल्या सुधारित किमतींनुसार, अनेक लोकप्रिय उत्पादनांचे दर घटले आहेत.

  • बटर: 100 ग्रॅम बटरची किंमत 62 रुपयांवरून 58 रुपये झाली आहे.
  • तूप: प्रति लीटर तुपाची किंमत 650 रुपयांवरून 610 रुपये झाली असून, 40 रुपयांची थेट कपात करण्यात आली आहे.
  • चीझ ब्लॉक: प्रति किलो चीझ ब्लॉकची किंमत 575 रुपयांवरून 545 रुपये झाली आहे.
  • पनीर: 200 ग्रॅम पनीरची किंमत आता 99 रुपये ऐवजी 95 रुपये असेल.
  • आईस्क्रीम: आईस्क्रीमचे दर 10 ते 600 रुपयांच्या रेंजमधून कमी होऊन 9 ते 550 रुपयांच्या नवीन रेंजमध्ये आले आहेत.
  • अमूल प्रोटीन: हे उत्पादन 150 ते 4,100 रुपयांच्या रेंजमधून 145 ते 3,690 रुपयांच्या रेंजमध्ये उपलब्ध होईल.
  • फ्रोजन स्नॅक्स: फ्रोजन स्नॅक्सची किंमत 45 ते 400 रुपयांवरून 42 ते 380 रुपये अशी कमी झाली आहे.
  • बेकरी उत्पादने: बेकरी उत्पादनांचे दर 11 ते 300 रुपयांवरून 10 ते 270 रुपयांच्या नवीन रेंजमध्ये आले आहेत.

दूधाच्या किमती बदलणार का?

जीसीएमएमएफने स्पष्ट केले आहे की, पाऊचमधील दुधाच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही, कारण जीएसटी सुधारणांपूर्वीही त्यावर शून्य टक्के जीएसटी होता. त्यामुळे दुधाच्या किमती पूर्वीप्रमाणेच राहतील.

कंपनीच्या मते, किमती कमी केल्याने आईस्क्रीम, चीज आणि बटरसारख्या उत्पादनांची मागणी वाढेल, ज्यामुळे त्यांचा एकूण व्यवसाय वाढण्यास मदत होईल. गेल्या आर्थिक वर्षात अमूलने 65,911 कोटी रुपयांचा महसूल मिळवला होता, जो मागील वर्षापेक्षा 11 टक्के जास्त होता.

हे देखील वाचा 

GST कमी झाल्याने गाड्या स्वस्त; Jaguar Land Rover ने जाहीर केल्या नव्या किंमती, ‘या’ मॉडेलवर 30 लाखांची सूट

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या