Home / देश-विदेश / पत्नी ‘पुरुष’ नाहीतर महिलाच; फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना का द्यावा लागतोय पुरावा? जाणून घ्या प्रकरण

पत्नी ‘पुरुष’ नाहीतर महिलाच; फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना का द्यावा लागतोय पुरावा? जाणून घ्या प्रकरण

Brigitte Macron: फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) आणि त्यांच्या पत्नी ब्रिजिट मॅक्रॉन (Brigitte Macron) यांना सध्या एका विचित्र प्रकरणाचा...

By: Team Navakal
Brigitte Macron

Brigitte Macron: फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) आणि त्यांच्या पत्नी ब्रिजिट मॅक्रॉन (Brigitte Macron) यांना सध्या एका विचित्र प्रकरणाचा सामना करावा लागत आहे. मॅक्रॉन हे त्यांच्या पत्नी ब्रिजिट या पुरुष नसून महिलाच असल्याचे सिद्ध करण्यासाठी थेट न्यायालयात पुरावेच सादर करणार आहेत.

पत्नी ब्रिजिट या ट्रान्सजेंडर महिला असल्याच्या चुकीच्या दाव्यांना पूर्णविराम देण्यासाठी आता राष्ट्राध्यक्षांना अमेरिकेच्या कोर्टात पुराव्यानिशी उतरावे लागणार आहे. त्यांचे वकील टॉम क्लेअर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते कोर्टात ब्रिजिट मॅक्रॉन गरोदर असतानाची आणि त्यांच्या मुलांना वाढवत असतानाची छायाचित्रे तसेच वैज्ञानिक पुरावे सादर करणार आहेत.

कशी सुरू झाली ही विचित्र अफवा?

2017 मध्ये नताशा रे (Natacha Rey) नावाच्या एका ब्लॉगने यूट्यूब व्हिडिओमध्ये दावा केला होता की फ्रेंच अध्यक्षांची पत्नी ब्रिजिट मॅक्रॉन या प्रत्यक्षात त्यांचा भाऊ जीन-मायकेल ट्रोग्नॉक्स आहेत, ज्यांनी लिंग बदलून आपले नाव बदलले आहे. तेव्हापासूनच या चर्चेला सुरुवात झाली.

2021 मध्ये एका मुलाखतीत हा दावा पुन्हा करण्यात आला आणि तो 2022 च्या फ्रेंच अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला.

कायदेशीर लढाई अमेरिकेत

फ्रान्समधील एका कोर्टात मॅक्रॉन दाम्पत्याने या ब्लॉगविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. त्यांना सुरुवातीला दोषी ठरवण्यात आले होते, पण जुलै 2025 मध्ये पॅरिस कोर्ट ऑफ अपीलने हा निकाल बदलला.

त्यानंतर अमेरिकेतील एका उजव्या विचारसरणीच्या इन्फ्लुएंसर कॅंडेस ओवेन्स यांनी 2024 मध्ये पुन्हा हेच दावे केले. त्यामुळे मॅक्रॉन दाम्पत्याने त्यांच्याविरोधात अमेरिकेत मानहानीचा खटला दाखल केला आहे. या खटल्यामध्येच राष्ट्राध्यक्षांना त्यांची पत्नी महिला असल्याचे सिद्ध करण्यासाठी पुरावे द्यावे लागणार आहेत.

अन्य वाद आणि मॅक्रॉन यांचे वैयक्तिक जीवन

मॅक्रॉन (47) आणि त्यांची पत्नी ब्रिजिट (72) यांची भेट इमॅन्युएल यांच्या हायस्कूलमध्ये झाली होती, तेव्हा ते विद्यार्थी होते आणि ब्रिजिट त्यांच्या शिक्षिका होत्या. तेव्हा त्या तीन मुलांची आई होत्या आणि त्यांचे लग्न झाले होते.

मात्र, इमॅन्युएल यांनी पॅरिसला जाण्यापूर्वीच त्यांच्याशी लग्न करण्याचे वचन दिले होते. 2007 मध्ये या दोघांनी लग्न केले. याआधीही मॅक्रॉन दाम्पत्य चर्चेत आले होते. विमानातून उतरताना ब्रिजिट यांनी इमॅन्युएल यांना कानशिलात लगावल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता.

हे देखील वाचा Royal Enfield ने केली मोठी घोषणा; बुलेटसह अनेक बाईक्सच्या किमतीत मोठी कपात, पाहा नवीन किंमती

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या