Home / News / Election Commission : मतदार यादी पुनर्परिक्षण ३० सप्टेंबरपर्यंत तयारी करा ! निवडणूक आयोगाचे निर्देश

Election Commission : मतदार यादी पुनर्परिक्षण ३० सप्टेंबरपर्यंत तयारी करा ! निवडणूक आयोगाचे निर्देश

Election Commission – संपूर्ण देशभरात येत्या ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये मतदार याद्यांचे (Voter lists) पुनरिक्षण करण्यात येणार असून येत्या ३० सप्टेंबरपर्यंत...

By: Team Navakal
Election Commission

Election Commission – संपूर्ण देशभरात येत्या ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये मतदार याद्यांचे (Voter lists) पुनरिक्षण करण्यात येणार असून येत्या ३० सप्टेंबरपर्यंत त्याची तयारी पूर्ण करण्याचे निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आहेत. सर्व राज्याच्या निवडणूक अधिकाऱ्यांना हे निर्देश देण्यात आले आहेत.

मतदारयाद्यांमध्ये परदेशी नागरिकांचा शिरकाव व याद्यांची पारदर्शकता वाढवण्यासाठी सर्व मतदारयाद्यांचे सखोल पुनर्परिक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी गेल्या महिन्यात दिल्लीत सर्व राज्यातील निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यानंतर त्यांना आता हे निर्देश देण्यात आले आहेत.

आयोगाने म्हटले की, येत्या पंधरा दिवसात या पुनरिक्षणासाठी सर्व राज्यांनी तयार राहावे. त्याचप्रमाणे राज्यांमध्ये गेल्या वेळेस झालेल्या पुनर्परिक्षणानंतरच्या याद्या तयार ठेवाव्यात. दिल्लीत २००८ तर उत्तराखंडमध्ये (Uttarakhand)२००६ मध्ये मतदार यादी पुनर्परिक्षण झाले होते.

बिहारमध्ये (Bihar) नुकतेच झालेले पुनर्परिक्षणही २००३ च्या याद्यांवर आधारलेले होते. निवडणूक आयोगाच्या कारभारावर सध्या विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. विरोधी पक्ष नेते राहुल गांधी (Rahul Gandhi)यांनी मुख्य निवडणूक आयुक्त (Chief Election Commissione)मतचोरीसारख्या गोष्टीला पाठिंबा देत असल्याचा आरोप करून एकच खळबळ माजवून दिली होती. त्या पार्श्वभूमीवर आयोगाकडून पारदर्शकतेसाठी पुनर्परिक्षण केले जात असल्याचा दावा करण्यात येत आहे.


हे देखील वाचा –

नवरात्रीत कोणत्या दिवशी कोणता रंग? पाहा संपूर्ण यादी

लातूर जिल्ह्यात ढगफुटी ; साडेतीन तास झोडपले!

विश्व हिंदू परिषदेचा इशारा; गरब्यात मुस्लीम व्यक्ती नको

Web Title:
संबंधित बातम्या