H-1B Visa Fee Not Annual, Clarifies Trump Administration
H-1B Visa Fee Not Annual – Trump – अमेरिकेत (USA)नोकरीसाठी येणाऱ्यांना आवश्यक असलेल्या एच १- बी व्हीसाची (H-1B Visa)फी एक लाख डॉलर्स करण्यात आलेली असून हे शुल्क वार्षिक नसल्याचे स्पष्टीकरण ट्रम्प( Donald Trump) प्रशासनाने दिले आहे.
हे व्हिसा शुल्क केवळ पहिल्या वेळेलाच आकारण्यात येणार असून सध्या ज्यांच्याकडे व्हिसा आहे किंवा नूतनीकरणासाठी हे शुल्क आकारले जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
व्हाईट हाऊसच्या प्रसिद्धीप्रमुखांनी काल हे स्पष्टीकरण जारी केले. या विषयावर अनेक अफवा पसरत असून लोकांमध्ये गोंधळाचे वातावरण असल्याने हे स्पष्टीकरण देण्यात येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही कर्मचाऱ्यांवर अमेरिकेत येऊन काम करणार्यांना आळा बसावा यासाठी एच – १ बी व्हिसा शुल्क दोन ते पाच हजार डॉलरवरून थेट एक लाख डॉलर एवढे करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
त्यानंतर अमेरिकेत काम करणाऱ्या अनेक तांत्रिक व आयटी कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. हे शुल्क प्रत्येक वर्षाला आकारले जाणार असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. व्हाईट हाऊसच्या प्रसिद्धीप्रमुखांनी केलेल्या खुलाशानंतर या शंकेचे निरसन करण्यात आले आहे.
हे देखील वाचा –
सबसे बडा जुमलेबाज! काँग्रेसकडून मोदींचा जेमिनी व्हिडिओ प्रसिद्ध