Surekha Yadav Asia’s First Woman Loco Pilot: आशिया खंडातील पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव यांची ३६ वर्षांच्या गौरवशाली सेवेनंतर ३० सप्टेंबर रोजी निवृत्ती होणार आहे. गेली 36 वर्षे त्यांनी सर्व रूढी-परंपरांना झुगारून देत एक आदर्श पायोनियर म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे.
रेल्वेतील त्यांच्या या प्रवासाने अनेक महिलांना प्रेरणा दिली आहे. मध्य रेल्वेने (Central Railway) ट्विटरवर ही माहिती दिली.
प्रेरणादायी कारकीर्द आणि सन्मान
मूळच्या साताऱ्याच्या असलेल्या सुरेखा यादव यांनी इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा पूर्ण केला. त्यानंतर, त्यांनी लोको पायलट म्हणून नोकरी स्वीकारली. पुरुषांचे वर्चस्व असलेल्या या क्षेत्रात त्यांनी अनेक अडथळे पार करत यशाची शिखरे गाठली.
2011 मध्ये त्या पहिली महिला लोको पायलट म्हणून रेल्वेचे संचालन करणाऱ्या आशियातील पहिल्या महिला ठरल्या. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे, 2023 मध्ये सोलापूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस चालवणारी त्या पहिल्या महिला लोको पायलट ठरल्या. अलीकडेच, जेव्हा त्या हजरत निजामुद्दीन-सीएसएमटी राजधानी एक्सप्रेसने मुंबईत दाखल झाल्या, तेव्हा सहकारी ट्रेन ड्रायव्हर्स आणि इतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे जोरदार अभिनंदन केले.
Smt. Surekha Yadav, Asia’s First Woman Train Driver, will retire on 30th September after 36 glorious years of service
— Central Railway (@Central_Railway) September 18, 2025
A true trailblazer, she broke barriers, inspired countless women, and proved that no dream is beyond reach.
Her journey will forever remain a symbol of women… pic.twitter.com/5zDOzvkAD4
आनंद महिंद्रा यांनीही केले कौतुक
मध्य रेल्वेने ‘एक्स’ (ट्विटर) वर पोस्ट करत म्हटले की, ‘सुरेखा यादव यांनी अनेक अडथळे पार केले आणि असंख्य महिलांना प्रेरित केले. कोणतेही स्वप्न आवाक्याबाहेर नाही, हे त्यांनी सिद्ध केले. त्यांचा प्रवास भारतीय रेल्वेतील महिला सक्षमीकरणाचे प्रतीक म्हणून कायम स्मरणात राहील.’
उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही सुरेखा यादव यांच्या निवृत्तीबद्दल पोस्ट करत त्यांना सेवेनंतरच्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
हे देखील वाचा – Royal Enfield ने केली मोठी घोषणा; बुलेटसह अनेक बाईक्सच्या किमतीत मोठी कपात, पाहा नवीन किंमती