Maruti Suzuki Price Cut: देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी Maruti Suzuki ने आपल्या अनेक मॉडेल्सच्या किमती कमी करण्याची मोठी घोषणा केली आहे. सरकारने नुकत्याच केलेल्या GST दरातील कपातीचा फायदा थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला असून, 22 सप्टेंबरपासून गाड्यांच्या किमती 1.29 लाख रुपयांपर्यंत कमी होणार आहेत.
GST कपातीमुळे किमती कमी
सरकारने 1200cc पर्यंतच्या पेट्रोल, CNG आणि LPG इंजिन असलेल्या तसेच 4 मीटरपेक्षा कमी लांबीच्या कारवरील GST दर 28 टक्क्यांवरून 18 टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. त्याचप्रमाणे, 1500cc पर्यंतच्या डिझेल कारवरही 18 टक्के GST लागू होणार आहे. याच GST कपातीचा लाभ Maruti Suzuki ने आपल्या ग्राहकांना देण्याचा निर्णय घेतला आहे.
Maruti Suzuki Price Cut: कोणत्या गाड्या किती स्वस्त होणार?
Maruti Suzuki ने त्यांच्या अनेक मॉडेल्सच्या किमती कमी केल्या आहेत. नवीन किमती 22 सप्टेंबरपासून लागू होतील.
- Super Carry LCV: 52,100 रुपयांपर्यंत
- S-Presso: 1,29,600 रुपयांपर्यंत
- Alto K10: 1,07,600 रुपयांपर्यंत
- Celerio: 94,100 रुपयांपर्यंत
- Wagon-R: 79,600 रुपयांपर्यंत
- Ignis: 71,300 रुपयांपर्यंत
- Swift: 84,600 रुपयांपर्यंत
- Baleno: 86,100 रुपयांपर्यंत
- Dzire: 87,700 रुपयांपर्यंत
- Fronx: 1,12,600 रुपयांपर्यंत
- Brezza: 1,12,700 रुपयांपर्यंत
- Grand Vitara: 1.07 लाख रुपयांपर्यंत
- Jimny: 51,900 रुपयांपर्यंत
- Ertiga: 46,400 रुपयांपर्यंत
- XL6: 52,000 रुपयांपर्यंत
- Invicto: 61,700 रुपयांपर्यंत
- Eeco: 68,000 रुपयांपर्यंत
- Super Carry LCV: 52,100 रुपयांपर्यंत
हे देखील वाचा – Royal Enfield ने केली मोठी घोषणा; बुलेटसह अनेक बाईक्सच्या किमतीत मोठी कपात, पाहा नवीन किंमती