Lionel Messi Maharashtra Visit : जगातील महान फुटबॉलपटू आणि अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सी डिसेंबर महिन्यात महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहे. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली आहे.
‘GOAT (Greatest Of All Time) टूर’चा एक भाग म्हणून मेस्सी 14 डिसेंबर 2025 रोजी महाराष्ट्राला भेट देणार आहे. 2011 नंतर मेस्सीचा हा पहिलाच भारत दौरा असेल.
महाराष्ट्रातील युवा खेळाडूंसोबत सराव करणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ‘एक्स’ (ट्विटर) खात्यावर पोस्ट करत म्हटले की, ‘लिओनेल मेस्सी महाराष्ट्रात येत आहे… आणि माझ्या तरुण मित्रांनो, तो तुमच्यासोबत फुटबॉल खेळणार आहे! मला वैयक्तिकरित्या सही केलेला फुटबॉल भेट दिल्याबद्दल मेस्सीचे आभार.’
Guess what!
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 21, 2025
Lionel Messi is coming to Maharashtra and….
will play football with you, my young friends 😊!
Thank you, Messi for gifting me your personally signed football!
I welcome your forthcoming visit to Mumbai on 14th December 2025, as a part GOAT Tour!
Under-14 young… pic.twitter.com/YkuicNk4dT
ते पुढे म्हणाले की, ’14 डिसेंबर 2025 रोजी GOAT टूरचा भाग म्हणून मुंबईत येत असलेल्या मेस्सीचे मी स्वागत करतो. महाराष्ट्र क्रीडा विभाग, MITRA आणि WIFA द्वारे निवडलेल्या 14 वर्षांखालील खेळाडूंना 14 डिसेंबरला मेस्सीसोबत सराव करण्याची संधी मिळेल.’ त्यांनी राज्यातील फुटबॉल चाहत्यांना आणि कॉर्पोरेट्सनाही या उपक्रमाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले.
केरळमध्येही खेळणार मैत्रीपूर्ण सामना
मेस्सीचा हा दौरा फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही. केरळचे क्रीडामंत्री व्ही अब्दुरहिमान यांनी त्यांच्या फेसबुक प्रोफाइलवर दिलेल्या माहितीनुसार, FIFA आंतरराष्ट्रीय विंडोदरम्यान नोव्हेंबर 2025 मध्ये लिओनेल मेस्सीसह संपूर्ण अर्जेंटिनाचा संघ केरळमध्ये एका मैत्रीपूर्ण सामन्यासाठी येणार आहे.
मेस्सी आणि त्यांच्या संघाने 2022 मध्ये कतारमध्ये फिफा वर्ल्ड कप जिंकला होता. आतापर्यंत आठ वेळा ‘बॅलन डी’ओर’ (Ballon d’Or) पुरस्कार जिंकण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे.
हे देखील वाचा – Navratri 2025 Colours: नवरात्रीत कोणत्या दिवशी कोणता रंग? पाहा संपूर्ण यादी